
फोटो सौजन्य - Social Media
झी मराठीवर टेलिकास्ट होणारी सुप्रसिद्ध मालिका कमळी नेहमीच चर्चेत असते. या मालिकेचे सगळेच पात्र सोशल मीडियावर नेहमीच तुफान करतात. मालिका नेहमी विविध वळण घेत असते. या मालिकेने आता नवे वळण घेतले आहे आणि हे ते वळण आहे, जो या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देशही आहे. आता कमळी तिच्या खऱ्या घरात येणार आहे. कमळीचे सत्य जगासमोर येणार आहे. महाजनांची मोठी लेक कोण? तर ती कमळी आहे, हे उत्तर आता सगळ्यांना मिळणार आहे.
या दिवसाची वाट कमळी या मालिकेचा प्रत्येक प्रेक्षक अगदी मालिकेच्या सुरुवातीपासून पाहत आहे पण आता प्रेक्षकांनो! तुमची आवडती कमळी म्हणजेच महाजनांची मोठी लेक आणि अन्नपूर्णा देवीची मोठी नातं तिच्या खऱ्या घरी जाणार आहे. कामिनी, रागिणी आणि अनिकाने केलेले प्रत्येक प्रयत्न आता धुळीस मिळणार आहेत आणि कमळीला तिचा हक्क मिळणार आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून हे क्षण प्रेक्षकांना पाहायचे होते. अशा चर्चाही सोशल मीडियावर तूफानीचे होत होते पण प्रेक्षकांना ते क्षण ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी पाहायला मिळणार आहेत आणि त्यासाठी स्वतः मालिकेचे निर्मातेही उत्सुक आहेत.
या प्रोमोमध्ये खलनायिकांच्या त्रिकुटाचे चेहरे उतरलेले दिसून येत आहेत तर राजन कमळीच्या डोक्यावर मायेने हात फिरवताना दिसतो. कमळी हीच राजनची मुलगी आहे, हे सत्य नेमकं कशा पद्धतीने उघड होणार, की कथेत आणखी एखादा धक्कादायक ट्विस्ट येणार, याची उत्सुकता या भागात वाढलेली दिसते. सत्य समोर आल्यावर अन्नपूर्णा आजीची प्रतिक्रिया असेल? या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.