(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ मालिकेत सध्या प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक अॅक्शन ट्रॅक पाहायला मिळत आहे. मोहिनी आणि तिचे वडील महेंद्र (शांतनू मोघे) यांच्यातील दमदार फाईट सीक्वेन्स केवळ अॅक्शनपुरते मर्यादित न राहता नात्यांमधील संघर्ष, भावनिक गुंतागुंत आणि एका वडिलांचा आपल्या मुलीला सक्षम बनवण्याचा प्रयत्न प्रभावीपणे मांडतो आहे. या सीनमुळे मालिकेची रंगत अधिकच वाढली असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मोहिनीची भूमिका साकारणारी अनघा ठाकूर हिने या अॅक्शन सीनबद्दल अनुभव सांगताना म्हटले की, शंतनू मोघे यांनी तिला खूप मार्गदर्शन केले. फाईट सीक्वेन्स करताना कोणती काळजी घ्यावी, स्वतःला आणि समोरच्या कलाकाराला इजा होऊ नये यासाठी काय करावे, याबाबत त्यांनी तिला महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सुरुवातीला भीती आणि दडपण जाणवत असतानाही अॅक्शन डायरेक्टर आणि टीमच्या मदतीने तिने हा सीन आत्मविश्वासाने साकारला. डान्सर असल्यामुळे तिने या सीनमध्ये एक वेगळा रिदम आणत अॅक्शन अधिक प्रभावी बनवली.
महेंद्रची भूमिका साकारणारे शांतनू मोघे यांनी सांगितले की, अॅक्शन सीन हे कलाकारांसाठी थरारक असतात, मात्र प्रेक्षकांच्या दृष्टीने या सीनमध्ये एक बाप आपल्या मुलीची परीक्षा घेताना दिसतो. पालकत्वातील जबाबदारी, मुलांना जगाशी भिडण्यासाठी तयार करण्याची प्रक्रिया या माध्यमातून अधोरेखित केली जाते. त्यांनी अनघासोबतची केमिस्ट्रीही उत्कृष्ट असल्याचे सांगितले आणि स्टंट्स करताना घेतली जाणारी काळजी, त्यामागील मेहनत आणि शिस्त यावरही भर दिला.
‘सुपर डुपर’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला; तिन्ही पिढ्यांना एकत्र आणणारा फॅमिली एंटरटेनर चित्रपट
एकंदरीत, मोहिनी मालिकेतील हा अॅक्शन ट्रॅक केवळ थरार निर्माण करत नाही, तर नात्यांमधील भावनिक बाजूही प्रभावीपणे उलगडतो. दमदार अॅक्शन, उत्कृष्ट अभिनय आणि भावनिक मांडणी यामुळे हा ट्रॅक सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे.






