Neha Gadre Return to India: ऑस्ट्रेलियाला रामराम ठोकला! दोन आठवड्यांत सगळं विकलं अन् मायदेशी परतली मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री नेहा गद्रे हिने सात वर्षे ऑस्ट्रेलियात राहिल्यानंतर पती ईशान बापट आणि बाळासह भारतात परतण्याचा निर्णय घेतला. गरोदरपणात कुटुंबापासून दूर राहिल्याने तिला आपल्या माणसांची आठवण येत होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांसोबत राहता यावं, यासाठी त्यांनी मायदेशी परतण्याचं ठरवलं.
Neha Gadre Return to India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Neha Gadre Return to India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)Neha Gadre Return to India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  • नेहा गद्रे सात वर्षांनंतर भारतात परतली

  • अवघ्या दोन आठवड्यांत ऑस्ट्रेलियातील संसार आवरला

  • मराठी सिनेसृष्टीत कमबॅक करण्याची तयारी

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या बऱ्याच अभिनेत्री आहेत, ज्या लग्नानंतर परदेशात जाऊन राहिल्या, काहींनी आता परत भारतात येऊन सिनेइंडस्ट्रीत कमबॅक पण केला. या यादीत आता अभिनेत्री नेहा गद्रे हिचंही नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून नेहा तिचा पती ईशान बापटसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहत होती. मात्र बाळ झाल्यानंतर काहीच महिन्यांत त्यांनी भारतात परतायचा निर्णय घेतला. या सगळ्याबद्दल त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

• 'मन उधाण वाऱ्याचे' पासून घराघरात पोहोचली

'मन उधाण वाऱ्याचे' आणि 'अजूनही चांद रात आहे' यांसारख्या गाजलेल्या मराठी टीव्ही मालिकांमधून नेहा घराघरांत पोहोचली. करिअर छान सुरू असताना तिनं लग्न केलं. लग्नानंतर ती ऑस्ट्रेलियात जाऊन राहिली. सात वर्षे ऑस्ट्रेलियात राहिली. तिथं नोकरी पण केली. पण बाळ झाल्यानंतर कुटुंबासोबत राहायचा निर्णय घेतला, आणि नेहा आणि तिचा पती बाळासह भारतात आले.

Neha Gadre Return to India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
India Bans Pakistani Web Series: पाकिस्तानी कंटेंटला भारतात नो एन्ट्री? केंद्र सरकारचा Netflix ला कडक इशारा!

• भारतात परतायचा निर्णय घेतला

नेहानं 2019 मध्ये ईशान बापटशी लग्न केलं. लग्नानंतर लगेचच ती ऑस्ट्रेलियाला जाऊन राहिली. लग्नाच्या सहा वर्षांनी त्यांच्या आयुष्यात बाळाचं आगमन झालं. गरोदरपणात कुटुंबापासून दूर राहिल्याची खंत नेहाच्या मनात होती. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, गरोदरपणात मी माझ्या कुटुंबाला खरंच खूप मिस केलं होतं, नंतर माझी आई ऑस्ट्रेलियाला आली. पण ईशानच्या आई-बाबांना व्हिसा आणि इतर कारणांमुळे यायला जमलं नव्हतं. या सगळ्यामुळे आम्ही भारतात परत यायचं ठरवलं. आमच्या या निर्णयामुळे दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण असल्याचंही नेहा म्हणाली. ती लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

Neha Gadre Return to India (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Harshad Atkari: ५० ATKT अन् गावभर नापासाचे होर्डिंग्ज! हर्षद अतकरीने सांगितला भूमिकेमागचा भन्नाट किस्सा!

• फक्त दोन आठवड्यांत निर्णय, सामान विकलं, संसार आवरला आणि परत आलो

परदेशातलं स्थायिक आयुष्य सोडून भारतात परतणं हे या जोडप्यासाठी सोपं नव्हतं. याविषयी नेहाचा पती ईशान बोलला.भारतात परत यायचा हा निर्णय आमच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. आम्ही फक्त दोन आठवड्यांत ऑस्ट्रेलियातल्या घरातलं सगळं सामान विकलं, तिथल्या गोष्टी आवरल्या आणि भारतात परतलो.

परदेशातलं ते ठराविक 'व्हाइट कॉलर' आयुष्य बस झालं, आता आपल्या माणसांसोबत राहून खऱ्या आयुष्याचा आनंद घेऊया, असा विचार आम्ही केला, असं ईशाननं म्हटलं.तसंच पती ईशान हा कॉलेजनंतर परदेशातच राहिल्याने त्याला कुटुंबात, भारतात परत यायची उत्सुकता जास्त होती, असंही नेहा यावेळी म्हणाली.

• कमबॅकची तयारी

दरम्यान, भारतात परतल्यानंतर नेहा आणि ईशान या दोघांनीही आता आपापल्या करिअरवर लक्ष द्यायचं ठरवलं असून नेहा सिनेइंडस्ट्रीत परत काम करायला उत्सुक आहे. काही दिवसांपूर्वी नेहानं ग्लॅमरस अंदाजातले काही फोटो शेअर केले होते. तेव्हापासूनच तिच्या कमबॅकच्या चर्चा रंगल्यात. तर 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' या सिनेमात नेहानं एक छोटी भूमिका साकारली होती.