Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
निसार वायनाड हे नाव मल्याळम इंडस्ट्रीत खूप मोठं होतं. त्याचा आवाज हुबेहूब प्रसिद्ध गायक उदित नारायण यांच्यासारखा होता. त्यामुळे लोक त्याला उदित नारायणचा डुप्लिकेट म्हणूनच ओळखत होते. त्याने अनेक स्टेज शो करत अनेक गाणी गायली. दुबईमध्ये त्याचे कॉन्सर्ट नेहमी असायचे त्याठिकाणी त्याचा खूप मोठा चाहता वर्ग होता. यावेळी सुद्धा तो त्याच कारणांसाठी दुबईला गेला होता. Entrainment News:
मिळालेल्या माहितीनुसार, निसारला दोन दिवसांपासून ताप येत होता. अंगात ताप असल्याने त्याने साधी पॅरासिटामॉल गोळी घेतली होती. त्याला वाटलं की ताप साधा असेल, बरा होईल. पण ताप काही कमी होईना. शनिवारी दुपारी त्याची तब्येत जास्तच बिघडली. म्हणून त्याला लगेच दुबईतल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्याला तपासलं तेव्हा कळलं की तापासोबत त्याला इन्फेक्शन पण झालं आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतू त्याचा जीव वाचवता आला नाही.
त्याच्या मित्राने ही माहिती दिली आहे.डॉक्टरांनी सांगितलं की त्याचा मृत्यू अॅसिडोसिसमुळे झाला आहे. शरीरात इन्फेक्शन वाढल्याने त्याचे सगळे अवयव हळूहळू निकामी झाले आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. एका साध्या तापाने इतका मोठा घात होईल असं कोणीच विचार केला नव्हता.
दुबईत निधन झाल्यानंतर त्याचं पार्थिव त्याच्या मूळ गावी केरळमध्ये आणण्यात आलं. तिथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि दोन लहान मुली आहेत. त्याच्या अशा अचानक जाण्यामुळे कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निसारच्या जाण्याने मल्याळम संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकार, गायक आणि चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. अवघ्या 44 व्या वर्षी एका गुणी कलाकाराने जगाचा निरोप घेतला, याचं सगळ्यांनाच दुःख आहे.






