
फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शन शेअर केले आहे. या कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने नमूद केले आहे की “मला जेव्हा breast cancer असल्याचे समजले तेव्हा मी पूर्णपणे तुटून गेले. त्यावेळी शारीरिक वेदना तर होत्याच त्याचबरोबर मानसिक आणि भावनिक त्रासही होता. अनेकदा मी एकटी पडली पण मला त्याचवेळी माझ्या मित्रांची साथ मिळाली आणि मी खचण्यापेक्षा पुन्हा उठून उभी राहिली. अनेकदा लोक मला विचारात असतात की तू इतकी फीट असून हे तुझ्याबरोबर असं का घडलं? त्यांना देण्यासाठी माझ्याकडे उत्तरं नाहीत आणि मला माहितही नाहीत. काही दिवस मी Mary Oliver यांच्या कवितांसारखी शांत राहण्याचा निर्णय घेतलाय आणि तशी माझी इच्छाही आहे. आज मी हसत दिवसाची सुरुवात केलीये आणि आज स्वतःला एक पदरात जिंक मिळण्याची जाणीव झालीये. उद्याच्या लढाईची तयारी तर आहेच पण मी आजचा दिवस तरी प्रेमाने आणि कृतज्ञतेने जगू इच्छिते.”
तिच्या या भावुक पोस्टमध्ये तिच्यासह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार दिसून आले आहेत, जे राजश्रीची खास भेट घेण्यासाठी आणि तिला आधार देण्यासाठी हॉस्पिटलात पोहचले आहेत. राजश्रीला भेट देण्यासाठी अभिनेत्री छाया कदम तसेच अभिनेत्री श्रिया पिळगावकरनेही हजेरी लावली आहे. तसेच अनेक मित्रमंडळींच्या उपस्थितीमुळे राजश्रीला धीर मिळाल्याचे स्पष्ट चित्र राजश्रीच्या नृत्याने दिसत आहे कारण राजश्रीने चक्क हॉस्पिटलमध्येच गाण्यावर ठेका धरला आहे आणि आयुष्य कसे जगले पाहिजे? याचे उत्तम उदाहरण तिने जगाला दिले आहे.
अभिनेत्री राजश्री देशपांडे ‘Sexy Durga’, ‘Angry Indian Goddesses’ तसेच ‘Satyashodhak’ या सिनेमांमधून सिनेरसिकांमध्ये चर्चेत आली होती.