Shah Rukh Kareena Dance: १५ वर्षांनंतर शाहरुख-करीनाची जोडी पुन्हा एकत्र! ‘डॅडी कूल’मधील धमाकेदार डान्सने चाहत्यांना केले थक्क

Shah Rukh Kareena Dance: शाहरुख खान आणि करीना कपूर खान १५ वर्षांनंतर ‘किंग’ चित्रपटातील ‘डॅडी कूल’ गाण्यात एकत्र दिसले आहेत. अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या आवाजातील गाण्याने चाहत्यांचे लक्ष वेधले.
 ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Published on: 
Updated on: 

Shah Rukh Kareena Dance: बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘तू मिल जाए’ या रोमँटिक गाण्यानंतर आता आणखी एक धमाकेदार गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’ असे या गाण्याचे नाव असून, यात शाहरुख खानसोबत अभिनेत्री करीना कपूर खानदेखील झळकत आहे. विशेष म्हणजे, तब्बल १५ वर्षांनंतर शाहरुख आणि करीनाची ऑनस्क्रीन जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. दोघांच्या जबरदस्त डान्स मूव्ह्ज आणि शानदार केमिस्ट्रीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘किंग’ चित्रपटातील वेगवेगळे पैलू निर्माते टप्प्याटप्प्याने प्रेक्षकांसमोर आणत आहेत. यापूर्वी ‘तू मिल जाए’ या गाण्यात शाहरुखचा रोमँटिक अंदाज आणि अॅक्शन अवतार पाहायला मिळाला होता. आता ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’मधून त्याचा हटके स्वॅग आणि डान्स पाहण्याची संधी चाहत्यांना मिळत आहे. दमदार बीट्स, आकर्षक संगीत आणि रेट्रो अंदाज यांचा सुरेख मेळ या गाण्यात साधण्यात आला आहे.

शाहरुख-करिनाच्या केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने

जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘डॅडी कूल’ या गाण्याला बॉलिवूडचा नवा साज चढवण्यात आला आहे. या गाण्यात शाहरुख खान आपल्या खास शैलीत आणि आकर्षक अंदाजात डान्स करताना दिसतो. तर करीना कपूर खान आपल्या स्टायलिश आणि सदाबहार लुकने लक्ष वेधून घेते. दोघांच्या डान्समधील ऊर्जा आणि केमिस्ट्री पाहून चाहत्यांना त्यांची जुनी जोडी पुन्हा पाहायला मिळाल्याचा आनंद होत आहे. तब्बल १५ वर्षांनंतर ही जोडी एकत्र आल्याने गाण्याची चर्चा अधिकच रंगली आहे.

अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या आवाजाची जादू

मूळ ‘डॅडी कूल’ हे गाणे बोनी एम. या लोकप्रिय संगीत समूहाचे असून, त्याचा मूळ गाभा कायम ठेवत ‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’ नव्या संगीतसाजात सादर करण्यात आले आहे. फ्रँक फॅरियन आणि जॉर्ज रेयम यांनी लिहिलेल्या या गाण्याला सचिन-जिगर यांनी संगीत दिले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांच्या आवाजाने गाण्याची रंगत आणखी वाढवली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांनी गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. कुमार यांनी या गाण्याचे हिंदी बोल लिहिले आहेत.

 ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Ayushmann Khurrana: मुलाच्या अभिनयाने आई भारावली! ‘ये प्रेम मोल लिया’ पाहून आयुष्मान खुरानाच्या आईची भावुक प्रतिक्रिया

‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम २०२६’मध्ये गाण्याचे अनावरण

‘डॅडी कूल (किंग व्हर्जन)’ या गाण्याचे अनावरण मेटाच्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम २०२६’ या विशेष कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातील ७०० हून अधिक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स सहभागी झाले होते. त्यामुळे गाण्याच्या लॉन्च सोहळ्याला विशेष रंगत आली. हे गाणे आता झी म्युझिक कंपनी आणि टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे.

२४ डिसेंबरला प्रदर्शित होणार ‘किंग’

दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘किंग’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि मार्फ्लिक्स पिक्चर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शाहरुख खानच्या प्रमुख भूमिकेतील हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील नवनवीन गाणी आणि झलकांमुळे चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

 ( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Bahirji Marathi Movie: ‘जिकर हाय तर फिक्कर नाय!’ बहिर्जी नाईक यांच्या शौर्याची गाथा मोठ्या पडद्यावर उलगडणार; मोशन पोस्टरने वेधले लक्ष