
apurva nemalekar
काही वेळानंतर या चोरांना अघोरी पद्धतीने मारलं जातं. तिथे एक स्त्री जिने लाल रंगाची साधी परिधान केलेली जी मंदिराच्या जवळ असलेल्या एका झोपडीत राहते तिला या सगळ्याची चाहूल लागते. लाल धाग्यात गुंडाळेली काळी बाहुली आणि पुढे जे काही होतं ते अंगावर काटा आणणारं आहे. अपुर्वाने या मालिकेच्या माध्यमातून निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. या हॉरर मालिकेमुळे सध्या अपुर्वा चांगलीच चर्चेत आहे. अपूर्वा नेमळेकर तिच्या चाहत्यांशी नेहमीच जोडलेली असते. तिच्या खाजगी आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीने ‘पद्मिनी’ नावाच्या सिरीजमध्ये झळकणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मुळात, पद्मिनी ही AI पासून तयार केलेली Micro Drama Series आहे. या सिरीजची निर्मिती आणि दिग्दर्शन स्वतः अपूर्वाने केले आहे.
Apurva Nemlekar : अभिनेत्री घेऊन येतेय नवी मालिका! ‘ती येतेय…’ AI Micro Drama Padmini
पद्मिनी ही एक दंतकथा आहे, जी जगासमोर अभिनयाच्या तसेच विकसित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आणण्याचे काम अपूर्वा नेमळेकर करत आहे. 11 elevanmedia च्या साहाय्याने, Padmini या दंतकथेला चाहत्यांसमोर मांडण्यात येत आहे. अगदी काहीच दिवसांपूर्वी अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया हँड्लच्या माध्यमातून या AI आधारित सिरीजचा पोस्टर लाँच केलं होतं. अपुर्वाने काही दिवसांपूर्वीच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल तिच्या चाहत्यांना स्पष्टता दिली होती. दरम्यान, या पोस्टरच्या पोस्टखाली कॅप्शनमध्ये “ती येते… जेव्हा सगळे झोपतात.” असे आकर्षक टायटल देण्यात आले होते.