
तुम्ही जर ब्रेड, पिझ्झा, बर्गर, पॅकबंद बटाट्याच्या चिप्ससह इतर जंक फूड खाण्याचेही शौकीन असाल आणि त्यांचे सतत सेवन करत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे, कारण तुमच्यासाठी सतत जंक फूड खाणे हानिकारक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट असलेल्या अनेक पदार्थांमध्ये कार्सिनोजेनिक आणि म्युटेजेनसारखे हानिकारक पदार्थ असतात, ज्यामुळे कर्करोगासारखे आजार होऊ शकतात(fast food harmful for health).
खरं तर रक्तातील ग्लुकोजची पातळी पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने अचानक वाढते, त्यामुळे शरीरात इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होते. यामुळे शरीरात कर्करोगाच्या असामान्य पेशी विकसित होऊ लागतात, ज्या शरीरासाठी हानिकारक मानल्या जातात. अशा परिस्थितीत आज तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे सेवन करा, पण कमी प्रमाणात. तुम्ही जर पिझ्झा-बर्गर सतत खात असाल,तर ते तुमच्यासाठी हानिकारक आहे. कारण बर्गर, पिझ्झा ब्रेड यांसारख्या पदार्थांमध्ये हानिकारक केमिकल पोटॅशियम आढळते, त्यामुळे ब्रेड पांढरा आणि मऊ राहतो.
या पदार्थांच्या अतिसेवनामुळे किडनी त्रास, थायरॉईड आणि कोलन कॅन्सरसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. त्याचबरोबर पॅकबंद चिप्सही आरोग्यासाठी चांगल्या मानल्या जात नाहीत. पॅक केलेल्या चिप्समध्ये फॅट आणि सोडियम जास्त प्रमाणात आढळतात. यासोबतच कृत्रिम रंग, टेस्ट आणि प्रिझर्व्हेटिव्हही मिसळले जातात. त्यांचे सतत सेवन केल्यामुळे शरीरातील अनेक आजारांना आमंत्रण मिळते.
तुमच्या शरीरासाठी रिफाइंड तेलाचा सतत वापर करणे देखील हानिकारक ठरू शकते. ट्रायग्लिसराइड, पॉलीअनसॅच्युरेटेड संयुगे रिफाइंड तेलामध्ये असतात. जे आम्लाने शुद्ध केले जाते. म्हणूनच डॉक्टर कमीतकमी रिफाइंड तेल वापरण्याची शिफारस करतात.
[read_also content=”भांडण, कटकटी, आजारपण, पैसा टिकत नाही, लग्न जुळत नाही… होलिका दहनाच्या दिवशी करा हा एक छोटाशा उपाय; आयुष्यातील सर्व Problems होळीत जळून राख होतील https://www.navarashtra.com/religion/religion/do-this-on-the-day-of-holika-dahan-is-a-small-solution-all-the-problems-in-life-will-be-burnt-to-ashes-in-holi-nrvk-252446.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]