Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात 35 ते 50 वयोगटातील प्रौढांमध्ये होतोय मुत्रविकाराचा आजार; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला ?

उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे अनेकदा डिहाड्रेशनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.जसजसा उन्हाळा तीव्र होत जातो, तसतसे मूत्रमार्गाच्या समस्या तोंड वर काढू लागतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 21, 2025 | 07:26 PM
उन्हाळ्यात 35 ते 50  वयोगटातील प्रौढांमध्ये होतोय मुत्रविकाराचा आजार; काय आहे तज्ज्ञांचा सल्ला ?
Follow Us
Close
Follow Us:

उन्हाचा तडाखा वाढल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे अनेकदा डिहाड्रेशनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.जसजसा उन्हाळा तीव्र होत जातो, तसतसे मूत्रमार्गाच्या समस्या तोंड वर काढू लागतात. या काळात सर्वात सामान्य समस्यांपैकी एक म्हणजे ३५ ते ५० वयोगटातील प्रौढांमध्ये मूत्रमार्गाच्या संसर्गात (यूटीआय) वाढ होते. अतिउष्णता आणि तापमानात होणारा चढउतार हे मूत्रविकार वाढण्यास कारणीभूत ठरतात. वेळीच निदान आणि उपचार केल्याने यूटीआयचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. शरीर हायड्रेटेड राखणे, चांगल्या स्वच्छता सवयींचे पालन करणे, श्वास घेण्यायोग्य सुती अंतर्वस्त्रांचा वापर करणे आणि जास्त काळ लघवी रोखून न धरणे यामुळे देखील यूटीआयची शक्यता कमी होऊ शकते.

मूत्रमार्गाचा संसर्ग (यूटीआय) हा मूत्रपिंड, मूत्रमार्ग, मूत्राशयासह मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागात दिसून येतो. लघवी करताना जळजळ होणे, लघवीमध्ये फेस किंवा दुर्गंधीयुक्त लघवी, वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, लघवीत रक्त येणे, ताप येणे आणि ओटीपोटात किंवा पेल्विक भागात वेदना होणे ही याची लक्षणे आहेत. जर यूटीआयवर वेळेवर उपचार केले नाहीत तर त्यामुळे पायलोनेफ्रायटिस (किडनी संसर्ग) किंवा सेप्सिस सारखी गंभीर गुंतागुंत होऊ शकते जी जीवघेणी ठरु शकते.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. पवन रहांगडाले म्हणाले की, उन्हाळ्यात डिहायड्रेशन होते, ज्यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (यूटीआय) धोका वाढतो. जेव्हा शरीरात पुरेसे द्रवपदार्थ नसतात तेव्हा मूत्राशयातून विषारी पदार्थ आणि बॅक्टेरिया बाहेर काढता येत नाही, ज्यामुळे संसर्ग होतो. उष्ण आणि दमट हवामान देखील जीवाणू आणि जंतूंच्या वाढीसाठी एक आदर्श वातावरण तयार करते. उन्हाळ्यात, जास्त घाम येणे हे देखील बॅक्टेरियाच्या वाढीस चालना देऊ शकते. यूटीआयला कारणीभूत ठरणारा सर्वात सामान्य जीवाणू म्हणजे एस्चेरिचिया कोलाई (ई. कोलाई) बॅक्टेरिया जो आतड्यांमध्ये आढळतो, परंतु जर तो मूत्रमार्गात गेला तर तो संसर्गास कारणीभूत ठरू शकतो. महिलांना यामुळे यूटीआय संसर्गाची शक्यता असते कारण त्यांच्या मूत्रमार्गाची लांबी कमी होते, ज्यामुळे बॅक्टेरिया मूत्राशयापर्यंत सहजपणे पोहोचतात.

डॉ. रहांगडाले पुढे म्हणाले की, प्रौढांमध्ये यूटीआय संसर्गाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. एका महिन्यात, ३५ ते ५० वयोगटातील १० पैकी ५ रुग्णांना वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे, लघवीवाटे रक्त येणे, ओटीपोटात दुखणे, थकवा, ताप आणि दुर्गंधीयुक्त लघवीची तक्रार करतात जे यूटीआय संसर्गांची लक्षणे आहेत. या रुग्णांना निदान करण्यासाठी आणि वेळीच उपचार सुरू करण्यासाठी मूत्र तपासणी आणि रक्त चाचण्यांचा सल्ला दिला जातो. यूटीआय टाळण्यासाठी, हायड्रेटेड राहणे, वेळोवेळी मूत्राशय रिकामे करणे, लघवी रोखून न ठेवणे, मूत्राशयावर परिणाम देणारे कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करणे आणि नाजूक भागाची चांगली स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

पुण्यातील मदरहुड रूग्णालय (लुल्लानगर) प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव म्हणाले की, उन्हाळ्यात ३५ ते ५० वयोगटातील महिला आणि १० ते १५ वयोगटातील मुलांमध्ये यूटीआयच्या प्रकरणांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ होते. डिहायड्रेशन, अस्वच्छता आणि जास्त घाम येणे यामुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ शकतो. वारंवार लघवी होणे, पोटदुखी आणि ताप ही त्याची लक्षणे असू शकतात. दर आठवड्याला, मूत्रमार्गाच्या संसर्गाचे १० रुग्ण आढळतात, ज्यांना तीव्र वेदना, लघवी करताना जळजळ होणे किंवा वारंवार लघवी होणे अशी लक्षणे दिसतात. लवकर बरे होण्यासाठी वेळीच निदान आणि य अँटीबायोटिक्सचा डोस दिला जातो. हायड्रेटेड राहणे, स्वच्छता राखणे आणि जास्त वेळ लघवी रोखून न ठेवणे, सैल आणि श्वास घेण्यायोग्य सुती अंतर्वस्त्र परिधान करणे, नाजूक भागामध्ये रासायनिक उत्पादनांचा तसेच आणि परफ्यूमचा वापर टाळणे योग्य राहिल.

Web Title: Kidney disease is occurring in adults aged 35 50 in summer what is the advice of experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 07:21 PM

Topics:  

  • Healhy Lifestyle

संबंधित बातम्या

सौंदर्य वाढवण्याप्रमाणेच ‘ही’ फुलं आहेत आरोग्यदायी
1

सौंदर्य वाढवण्याप्रमाणेच ‘ही’ फुलं आहेत आरोग्यदायी

World Parkinson Day 2025: हात पाय थरथरताय? कोणत्या वयोगटातील लोकांना ‘या’ आजाराचा धोका जास्त असतो? काय सांगतात तज्ज्ञ?
2

World Parkinson Day 2025: हात पाय थरथरताय? कोणत्या वयोगटातील लोकांना ‘या’ आजाराचा धोका जास्त असतो? काय सांगतात तज्ज्ञ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.