फोटो सौजन्य - Social Media
आताच्या काळामध्ये हृदयविकाराचा झटका येणे अतिशय सामान्य होत चाललं आहे. या भयंकर प्राणघातक विकाराचा धोखा अगदी नवं तरुणांनाही सोडत नाही आहे. व्यायामशाळेमध्ये व्यायाम करत असताना अति व्यायाम केल्यामुळे तसेच थकवा असताना देखील खेळातून माघार न घेतल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. कदाचित असे अनेक उदाहरणे सोशल मीडियावर तुम्ही पाहूनही असाल. पूर्वीच्या काळामध्ये हा विकार जास्तकरून वयोवृद्धांना होत असायचा परंतु जीवनशैलीतील बदलामुळे आजआज्या जागी तरुणही याने पीडित आहेत. अनेकजण मृत्यूमुखी गेले आहेत.
हे देखील वाचा : ITBP ने आयोजित केली भरतीची प्रक्रिया; ५४५ रिक्त पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती
आपण अनेकदा ऐकले असेल किंवा वाचले असेल. हृदयविकाराचा झटका येण्याच्या पहिले आपले शरीर आपल्याला काही संकेत देतो. त्या संकेतांना वेळीच ओळखून जर व्यक्तीने त्वरित हालचाल केली, तर कदाचित त्याचा जीव वाचण्याची शक्यता अफाट असते. परंतु, जर लक्षणांना दुर्लक्ष केले तर प्रकरण जीवावर बेतते. बऱ्याच जणांना हा गैरसमज असतो कि हृदयविकाराचा झटका येण्याच्या आधी फक्त छातीमध्ये दुखणे असते. अनेकदा तर ऍसिडिटीमुळे छाती जड होण्या सारख्या परिस्थितीलाही लोक हार्ट अटॅक समजू लागतात.
हार्ट अटॅकचे संकेत फक्त छातीत दुखणे नसून शरीराच्या इतर भागांमध्ये वेदना होणेही हार्ट अटॅकचे संकेत असू शकते. हार्ट अटॅक येणाच्या पूर्वी व्यक्तीच्या खांद्यमध्ये किंवा पाठीमध्ये दुखू लागते. ही वेदना मूलतः छातीतून पसरते. जर असे जाणवल्यास ताबडतोब रुग्णालयाची वाट धरावी. हार्ट अटॅकच्या वेळी डाव्या हातात तीव्र वेदना किंवा अस्वस्थता जाणवू शकते. ही वेदना हळूहळू हाताच्या खालच्या बाजूस पसरणारी असू शकते, जे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्याचे द्योतक असते.
हे देखील वाचा : HAL मध्ये ऑपरेटर पदासाठी भरती; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
एखाद्या व्यक्तीला अनपेक्षितरित्या जबडे दुखी होण्यास सुरुवात झाली किंवा जबडयांमध्ये तीव्र वेदना व्हायला लागले, तर हे का दुखत आहे? यावर स्वतः वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. अचानक जबडे दुखी झाल्यास तावरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. फक्त वेदनाकॅग नव्हे तर पोटामध्ये होणाऱ्या काही समस्या जसे कि मळमळ किंवा अपचनदेखील हृदयविकाराचे संकेत असू शकतात. अनेक लोक यास अपचन किंवा गॅसची समस्या मानून दुर्लक्ष करतात, पण ते हृदयविकाराचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. शरीरामध्ये असे काही जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.