Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Health Care Tips : मासिकपाळीची समस्या असो किंवा वयोमानुसार होणारे आजार; महिलांच्या व्याधींवर ‘हे’ आयुर्वेदीक चूर्ण आहे वरदान

महिलांची मासिकपाळीची समस्या असो किंवा बाळंपणातील व्याधी यावर संजिवनी म्हणून काम करते ही आयुर्वेदिक पावडर, नेमके याचे फायदे काय, जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 22, 2025 | 01:20 PM
Health Care Tips : मासिकपाळीची समस्या असो किंवा वयोमानुसार होणारे आजार; महिलांच्या व्याधींवर ‘हे’ आयुर्वेदीक चूर्ण आहे वरदान
Follow Us
Close
Follow Us:
  • मासिकपाळीची समस्यावर रामबाण उपाय
  • महिलांच्या व्याधींवर संजिवनी सारखं काम करते हे चूर्ण
  • कसा करावा आहारात समावेश

धवपळीच्या आयुष्यात अनेक महिलांना अनियमित मासिका पाळीचा त्रास जाणवतो. सर्वसाधारणपणे अनेक महिलांमध्ये हा त्रास आता दिसून येतोच येतो. आजकाल जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे फक्त मासिकपाळीच नाही तर वयोमानानुसार होणारे शारीरिक व्याधी देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पुर्वीच्या काळाबद्दल सांगायचं झालंच तर साठी पार केलेल्या महिला देखील हाडामासाने दणकट होत्या. मात्र ती परिस्थिती आता राहिलेली नाही. काळ बदलला , खाण बदललं तसंच शरीराच्या तक्रारी सुरु व्हायचा कालक्रम देखील बदलला. आता तर 35 ओलांडली की महिलांना हाडांचे आणि मणक्याच्या आजारांचे त्रास सुरु होतात. अशावेळी आरोग्यतज्ज्ञ संतुलित आहाराचं सेवन करण्याचा सल्ला देतात. पण फक्त दोन वेळंच योग्य जेवण इतकंच पुरेसं आहे का ? तर नाही. जेवणाबरोबर आयुर्देदीक घटकांचा समावेश असणं देखील तितकंच महत्वाचं आहे.

आयुर्वेदानुसार महिलांची मासिकपाळीची समस्या असो किंवा बाळंपणातील व्याधी यावर शतावरी हे संजिवनीसारखं काम करतं.
आयुर्वेदात शतावरीला “स्त्रियांची अमृतवनस्पती” असे म्हटले जाते. या वनस्पतीपासून तयार केलेला शतावरी कल्प हा अत्यंत पौष्टिक, शक्तिवर्धक आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. शतावरीची पावडर, साखर, वेलची, तूप आणि दूध यांचा समावेश आहारात ठेवणं फायदेशीर मानलं जातं. शतावरी कल्प शरीरातील अनेक तक्रारींवर नैसर्गिकरीत्या उपाय करतो.

Hair Care Tips: २० रुपयांच्या ‘या’ पदार्थामुळे होतील काळेभोर सुंदर केस, दिवाळीत वाचेल पार्लरला जाण्याचा खर्च

 

शतावरी कल्पचे फायदे

शतावरी कल्पचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो स्त्रियांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मासिक पाळीतील अनियमितता, वेदना आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. प्रसूतीनंतर शरीरातील कमजोरी दूर करतो तसेच स्तनदुधाची निर्मिती वाढवतो. रजोनिवृत्तीच्या काळात होणारे मानसिक व शारीरिक बदल सुसह्य बनवतो.

शतावरी कल्प शरीराला शक्ती, सहनशक्ती आणि रोगप्रतिकारकता प्रदान करतो. थकवा, कमजोरी आणि वारंवार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करतो. मानसिक ताण, चिंता आणि झोप न येणे यांसारख्या समस्यांवरही तो परिणामकारक ठरतो. शतावरीमध्ये नैसर्गिक शीतलता असल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहते. तसंच पचनशक्ती वाढवतो आणि आम्लपित्त, अपचन अशा तक्रारींवर उपयोगी ठरतो. याच्या सेवनाने हार्मोनल संतुलित होण्यास मदत मिळते. ज्यामुळे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. दैनंदिन जीवनात थोड्या प्रमाणात शतावरी कल्प घेतल्यास एकूणच शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने राहतात.

कसा वापर करावा ?

सेवनासाठी सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात एक चमचा शतावरी कल्प घेणे योग्य मानले जाते. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखररहित प्रकार घ्यावा.एकूणच, शतावरी कल्प हा नैसर्गिक टॉनिक असून तो स्त्री-पुरुष दोघांनाही ताकद, शांतता आणि संतुलन देतो. योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास तो शरीरासाठी खऱ्या अर्थाने “आयुर्वेदीक अमृत” ठरतो.

‘या’ आजारात हाडे होतात पोकळ, फ्रॅक्चरचा धोका झपाट्याने वाढतो, Bone Density कशी वाढवायची?

 

 

Web Title: Periods problems or age related diseases shatavari kalpa is beneficial for womens ailments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 01:20 PM

Topics:  

  • Periods

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.