
दात हे आपल्या शरिराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. दातांशिवाय आपलं आयुष्य काय होऊ शकतं याची कल्पनाही आपण करू शकत नाही. ते केवळ आपल्याला जेवणासाठीच मदत करत नाहीत तर आपल्या सौंदर्यातही (Beauty) भर घालतात. दातदुखी (Toothache) किंवा दातांसंबंधीच्या समस्यांसाठी अनेक कारणं जबाबदार असतात. दातदुखीकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर पुढे चालून त्याचं मोठ्या आजारात रूपांतर होऊ शकतं.
यात अनेक कारणं आहेत ज्यामुळे दात आणि हिरड्यांची समस्या निर्माण होते. नीट ब्रश न करणं, तोंड स्वच्छ न धुता किंवा पाणी न पिता झोपणं, धूम्रपान करणं किंवा अति गोड पदार्थ खाणं यामुळे तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. यामुळे श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून (Gums) रक्त येणं आणि दात कमकुवत होणं यासारखी पीरियोडॉन्टल लक्षणं दिसू शकतात. हेल्थ लाइनच्या बातम्यांनुसार, पीरियोडॉन्टलपासून (Periodontal) सुटका मिळवण्याचे अनेक पारंपरिक मार्ग आहेत. ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या हिरड्या निरोगी ठेवू शकता. यासाठी काही घरगुती उपायही करता येतील.
मीठाचा वापर कसा कराल ?
एक टीस्पून मीठ आणि एक कप कोमट पाणी चांगलं मिसळून घ्या. हे मिश्रण तोंडात ३० सेकंद ठेवा आणि नंतर गुळणी करून टाका. दिवसातून दोन ते तीन वेळा ही कृती करा.
वरील घरगुती उपाय करून तुम्ही तुमचे दात आणि हिरड्यांची काळजी घेऊ शकता.