
तंबाखू खाऊन दातांमध्ये वाढलेल्या वेदना कमी करण्यासाठी स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाचा करा वापर, दात होतील स्वच्छ
दात खराब होण्याची कारणे?
दातांमधील कीड नष्ट करण्यासाठी उपाय?
लवंगाचे दातांना होणारे फायदे?
प्रत्येकाला कायमच आपले दात स्वच्छ हवे असतात. पण सतत तिखट, तेलकट आणि कोणत्याही चिकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे दातांच्या समस्या खूप जास्त वाढतात. दातांवर वाढलेला पिवळा थर, कीड, दातांमधून रक्त येणे, हिरड्या दुखणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यानंतर महिलांसह पुरुषसुद्धा कायमच दुर्लक्ष करतात. पण वारंवार दातांच्या समस्या उद्भवू लागल्यास वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तोंडात बॅक्टेरिअल इन्फेक्शन, जास्त गोड पदार्थ खाणे, तंबाखू, मद्यपान इत्यादींमुळे दातांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. दातांवर वाढलेल्या पिवळ्या थरामुळे चारचौघांमध्ये हसताना लाजिरवण्यासारखे वाटते. तसेच पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या टूथपेस्टचा वापर केला जातो. यामुळे फारसा फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दातांमध्ये वाढलेल्या वेदना आणि इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी स्वयंपाक घरातील कोणत्या पदार्थांचा वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)
शरीरातील कोलेजन आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे! कोरडी फळे म्हणजे उत्तम पर्याय
स्वयंपाक घरात लवंग कायमच उपलब्ध असते. या मसाल्याचा वापर केल्यामुळे जेवणाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. लवंग मसाला चवीला अतिशय तिखट असतो. लहानशी लवंग किचनचे सौंदर्य वाढवण्यासाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. लवंगमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात. यामुळे दातांच्या वेदना कमी होतात. दातांमध्ये वाढलेली कीड नष्ट करण्यासाठी लवंगचा वापर करावा. यामुळे कीड नष्ट होऊन जाते दात दुखत नाही.
दातांमध्ये वाढलेल्या वेदना आणि कीड नष्ट करण्यासाठी कापसाच्या गोळ्यावर लवंग तेल ओतून दातांमध्ये ठेवावे. ३० मिनिटं ठेवल्यानंतर कापूस काढून दात स्वच्छ करून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याच्या गुळण्या करा. यामुळे कीड निघून जाईल आणि दात स्वच्छ होतील. लवंगात युजेनॉल नावाचे सक्रिय रसायन आढळून येते, ज्यामुळे भूल देण्याची प्रक्रिया सहज होते. लवंग किंवा लवंगाचे तेल हिरड्यांमध्ये काहीवेळ ठेवल्यास दातांच्या समस्या तात्काळ कमी होतील आणि दात स्वच्छ होतील.
लवंगमध्ये वाढलेले दातांमधील किड वाढवणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यास मदत होते. पण लवंग ठेवून सुद्धा दातांमधील वेदना कमी होत नसतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. लवंगमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म हिरड्यांना आलेली सूज कमी होतो. लवंगचा वापर तात्पुरता उपचार करण्यासाठी केला जातो. याशिवाय दातांमध्ये कीड लागू नये म्हणून सतत गोड पदार्थांचे सेवन करणे टाळावे.
जेवणात फोडणी देण्यासाठी लसुणचा वापर केला जातो. लसूणमध्ये असलेल्या घटकांमुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीरसुद्धा अनेक फायदे होतात. लसूण केवळ फोडणी देण्यासाठी नाहीतर पदार्थाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी सुद्धा वापरली जाते. यामध्ये असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लसूणचा वापर केल्यास दातांमध्ये लागलेली कीड नष्ट होईल.
Ans: दिवसातून दोनदा (सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी) फ्लोराईडयुक्त टूथपेस्टने दात घासणे उत्तम.
Ans: दूध, दही, पनीर यांसारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ आणि सफरचंद, गाजर यांसारखी कडक फळे-भाज्या खाव्यात.
Ans: गोड आणि चिकट पदार्थ खाणे टाळा, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन करू नका.