

नवी दिल्ली - हिमाचलच्या ६८ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान झाले आहे. लाहौल स्पितीमध्ये सर्वाधिक ६२.७५% मतदान झाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर, सिरमौर जिल्ह्यात ६०.३८% मतदान झाले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा गृह जिल्हा मंडी आता ५८.९०% मतदानासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. चंबा जिल्ह्यात सर्वात कमी ४६% मतदान झाले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.
संपूर्ण हिमाचलमधून ४१२ उमेदवार रिंगणात आहेत. राज्यातील सुमारे ५६ लाख मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये २८ लाख ५४ हजार ९४५ पुरुष, २७ लाख ३७ हजार ८४५ महिला आणि ३८ तृतीय लिंग मतदार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २०१७ मध्ये राज्यात ७५.५७% मतदान झाले होते. मतदान संपल्यानंतर ईव्हीएम कडेकोट बंदोबस्तात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. या खोल्यांवर निमलष्करी दल आणि पोलीस कर्मचारी रात्रंदिवस पहारा ठेवणार आहेत. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.