मुलाला सुधारा नाहीतर.... लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून अभिनव अरोराला जीवे मारण्याची धमकी; कुटूंबियांचा धक्कादायक दावा
सोशल मीडियावर बाल संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दहा वर्षीय अभिनव अरोरा याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असल्याचा धक्कादायक दावा त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. अभिनव अरोराची आई ज्योती अरोरा यांनी हा खुलासा केला आहे. ज्योती अरोरा यांनी सांगितलं की, त्यांना कॉलव्दारे मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा- 50 हजारांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगताय? तर थांबा, आता द्यावा लागेल…
अभिनव अरोराची आई ज्योती अरोरा यांनी सांगितलं की, मला एक एसएमएस आला होता. तो मॅसेज लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून असल्याचं सांगितलं गेल. त्यामध्ये म्हटलं होतं की, तुमच्या मुलाला सुधारा, तो हिंदू धर्माची बदनामी करत आहे. जर तो सुधारला नाही तर त्याला गोळ्या घातल्या जातील. काल रात्रीही आम्हाला फोन आला होता पण बोलता आले नाही. आज पुन्हा त्याच नंबरवरून कॉल आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण अरोरा कुटूंबिय घाबरले होते. याबाबत त्यांनी एसएसपींना पत्र पाठवत तक्रार देखील केली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मिळेलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 3.37 वाजता ज्योती अरोरा यांच्या मोबाईलवर एक एसएमएस आला, ज्यामध्ये एसएमएस पाठवणाऱ्याने स्वत:ची गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याची ओळख दिली आणि सांगितले की, तुमच्या मुलाला सुधारा, तो हिंदू धर्माची बदनामी करत आहे. जर तो सुधारला नाही तर त्याला गोळ्या घातल्या जातील.
अभय प्रताप सिंह यांच्या नावाने हा नंबर व्हॉट्सॲपवर दिसत असल्याचे ज्योती अरोरा यांचं म्हणणं आहे. या धमकीनंतर कुटुंबीय प्रचंड घाबरलं आहे. आईने एसएसपी शैलेश कुमार पांडे यांना मेलवर तक्रार पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. एसएसपी म्हणाले की, त्यांना अद्याप या प्रकरणाची कोणतीही माहिती नाही. कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल.
हेदेखील वाचा- Who is Shaina NC: गिनीज बुकमध्ये नोंद, भाजपच्या प्रवक्त्या, शिंदे गटाकडून तिकीट; कोण आहेत शायना एनसी?
दिल्लीतील एका खासगी शाळेत पाचव्या वर्गात शिकणारा दहा वर्षीय अभिनवने सांगितलं की, धमक्या मिळाल्यानंतर तो शाळेत जाऊ शकत नाही, त्याची बहीणही शाळेत जाऊ शकत नाही.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जगद्गुरू रामभद्राचार्य अभिनव अरोराला फटकारत आहेत आणि त्यानंतर अभिनवला स्टेजवरून हटवण्यात आले आहे. बिश्नोई गँगकडून मिळालेल्या धमकीनंतर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
अभिनवने सांगितलं की, हा व्हिडिओ वृंदावनचा गेल्या वर्षीचा आहे. गुरु या नात्याने रामभद्राचार्यांनी त्याला फटकारले, पण नंतर आशीर्वाद दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनवला खूप ट्रोल करण्यात आले, सोशल मीडियावर अनेकांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली.
लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीची दहशत आता उत्तर प्रदेशातील मथुरेत पोहोचली आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉरेन्स बिश्नोई गँग बॉलीवूडच्या अनेक दिग्गजांवर नजर ठेवत आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स गँगच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत.
काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर लॉरेन्स गँगची नजर अभिनेता सलमान खानवर आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, या टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येपूर्वी त्यांच्या घराची आणि कार्यालयाची चाचपणी केली होती.