Photo Credit- Social Media (कोण आहेत शायना एनसी)
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी राजकीय पक्षांचे राजकीय डावपेचामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी. सोमवारी सकाळ अचानक भाजपमध्ये असलेल्या शायना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवेश केला. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला. पक्षात प्रवेश करताच शायना यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून मुंबादेवी मतदारसंघातून तिकीटही मिळाले.
शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी मंगळवारी युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती नेतृत्वाचे आभार मानले मुंबईतील जनतेच्या हितासाठी आपण कटिबद्ध आहोत. निवडणूक जिंकल्यानंतर त्या आपल्या मुंबईकरांचा आवाज सभागृहात बुलंद करणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा: Shrinivas Vanga : “आत्महत्येचा विचार मनात येऊ लागलाय…” असं म्हणणारे श्रीनिवास वनगा
तर, शिवसेनेकडून आपल्या उमेदवारीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, कुठून उमेदवार उभा करायचा हे नेहमीच महायुतीचे नेतृत्व ठरवते. मला फक्त आमदार व्हायचे नाही, तर जनतेचा आवाज बनायचे आहे. मी लोकांना खात्री देते की माझ्याकडे कोणताही वैयक्तिक सहाय्यक (पीए) नाही. तरीही मी सगळ्यांच्या फोन कॉल्सला उत्तर देते.
शायना एनसी या केवळ शिंदे गटाच्या उमेदवारच नाही तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध फॅशन डिझायनरही आहेत. शायना मुस्लिम कुटुंबातून आल्या आहे. 18 वर्षांच्या असताना त्यांनी फॅशन डिझाईन करायला सुरुवात केली. शायना एक बुटीक देखील चालवतात. त्याच्या बुटीकमध्ये अनेक नायिका म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय, जुही चावला आणि महिमा चौधरी यांसारख्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे पोषाख शायना यांनी स्वत: डिझाइन केलेले आहेत. शायना यांच्या डिझाइन केलेल्या साड्या खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या नावाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांनी सर्वात वेगवान साडी नेसण्याचा विश्वविक्रम केला आहे.
हेही वाचा: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंचा क्रिकेटला रामराम!
फॅशन डिझायनिंगसोबतच शायना यांनी राजकारणातही प्रवेश केला. दिवंगत भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी 14 सप्टेंबर 2004 रोजी शाईनाचा भाजपमध्ये समावेश केला. गेल्या 20 वर्षांपासून त्या भाजपमध्ये होत्या. मात्र, 28 ऑक्टोबर रोजी त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. फेब्रुवारी 2007 मध्ये त्यांना मुंबई भाजपचे प्रवक्ते बनवण्यात आले. मार्च 2010 मध्ये त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या झाल्या. एप्रिल 2013 मध्ये भाजपने शाय़ना भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता बनवण्यात आले.
हेही वाचा: Gopal Shetty Rebellion: देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढणार; बडा नेता करणार बंडखोरी