भीलवाडा- कोरोना संकटाच्या काळात इंग्रजी शिक्षकाची नोकरी गेली, त्यामुळे या शिक्षकावर कडक उन्हाळ्यात लोकांना घरोघर झोमॅटोची फूड डिलिव्हरी करण्याची वेळ आली. या शिक्षकावर एवढी वाईट वेळ आली की, त्याला कधी रस्त्यांवर, कधी हॉटेलांच्या बाहेर रात्री काढाव्या लागल्या. एम ए पास असलेल्या या डिलिव्हरी बॉयची दया आल्याने, एका ग्राहकाने त्याला बाईक घेवून देण्याचा निश्चय केला. (A man purchase Bike For Zomato Delivery Boy)
यासाठी या ग्राहकाने ट्विटरवर लोकांची मदत मागितली आणि क्राऊड फंडिंगमध्ये दोन तासांत १ लाख ९० हजार रुपये जमा केले. त्यानंतंर या ग्राहकाने या डिलिव्हरी बॉयला स्प्लेंडर बाईक घेऊन दिली. आता गाडीचे पुढचे हप्ते हा डिलिव्हरी बॉय त्याच्या कमाईतून भरणार आहे.
भीलवाड्यात राहणाऱ्या १८ वर्षांच्या आदित्य शर्माने पुढाकार घेत, या उच्चशिक्षित डिलिव्हरी बॉयसाठी क्राऊड फंडिंग जमा करत दुर्गाशंकर मीणा यांना मंगळवारी स्प्लेंडर बाईक घेऊन दिली. दुपारी दोनच्या सुमारास ४० अंश तापमानात दुर्गाशंकर ऑर्डर घेऊन आला होता. दुर्गाशंकर जेव्हा डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेतून आदित्यच्या घरी आला, तेव्हा आदित्यने त्याच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली, त्यावेळी त्याच्या दुर्दशेची माहिती त्याला समजली. दुर्गाशंकर निघाला तेव्हा त्याचा मोबाईल नंबर आदित्यने घेतला. त्यानंतर त्याने झोमॅटोकडून त्याची अधिक माहिती घेतली.
[read_also content=”विजेचा शॉक बसल्याने लोणंद येथील महिलेचा मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/woman-dies-in-lonand-due-to-electric-shock-satara-nrka-268351.html”]
त्यानंतर आदित्यला वाटले की, या डिलिव्हरी बॉयला मदत केली पाहिजे. त्यासाठी त्याने संध्याकाळी मदत मागणारे क्राऊड फंडिंगसाठी ट्विट केले. ट्विटरवर त्याने दुर्गाशंकरचा फोटो अपलोड करुन त्याच्या परिस्थितीबद्दल आणि सध्या करत असलेल्या कामाची माहिती पोस्ट केली. त्याला बाईक देण्यासाठी ७५ हजारांची गरज असल्याचे सांगितले. तयानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लोकांनी मदतीचे ट्विट केले.
या ट्विटनंतर दुर्गाशंकरच्या मदतीसाठी १.९० लाख रुपयांचा निधी जमा झाला. निधी एवढा जास्त जमा झाला की आता मदत करु नका असे आवाहन करण्याची वेळ आली. त्यानंतर आदित्य डिलिव्हरी बॉयला घेऊन शोरुममध्ये गेला आणि त्याने बाईकची किल्ली त्याच्य् हाती दिला. त्यावेळी दुर्गाशंकरच्या डोळ्यात पाणी आले. त्याला बाईकवर बसवून आदित्यने फोटोही काढले.
[read_also content=”राज ठाकरे म्हणजे राजकीय व्यासपीठावरील नवा जॉनी लिव्हर, जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा https://www.navarashtra.com/maharashtra/jitendra-awhad-said-that-raj-thackeray-is-johney-lever-of-political-stage-nrsr-268336.html”]