Jammu-Kashmir Gulmarg stirs as snow mountain collapses; 3 foreign nationals missing; death of one
Gulmarg Snow Mountain Collapses : जम्मू आणि काश्मिरच्या गुलमर्ग येथे बर्फाचा डोंगर कोसळला असून, यामध्ये तीन परदेशी नागरिक अडकले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, कालपासूनच गुलमर्ग येथे विंटर सिझन खेलो इंडिया स्पर्धा सुरू झाली असून, या घटनेने मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. वीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे एक हजार खेळाडू, अधिकारी आणि सहाय्यक कर्मचारी सहभागी होणार आहेत.
यावेळी, खेळाडू स्नोबोर्डिंग, अल्पाइन स्की, नॉर्डिक स्की आणि स्नो पर्वतारोहण इत्यादी खेळांमध्ये आपली ताकद दाखवतील. स्की पर्वतारोहण स्पर्धांमध्ये दहा राज्ये भाग घेणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गुलमर्ग इथं भूस्खलनाची घटना घडली. गुलमर्ग हे पर्यटन स्थळ असून सध्या इथं बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळं पर्यटकांसाठी हा पर्यटनाचा हंगाम आहे. दरम्यान, या भूस्खलनात तीन परदेशी पर्यटक अडकून पडले होते. याची खबर मिळताच लष्कराच्या बचाव पथकाकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली.