रांची : झारखंडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. झारखंडच्या धनबाद इथल्या एका अवैध कोळसा खाणीत भीषण अपघात ( illegal coal mine accident in Jharkhand) झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं असून यामध्ये अडकून पडलेल्या अनेकांना बाहेर काढण्याच काम सुरू आहे.
[read_also content=”गर्लफ्रेंडसोबत बीचवर एन्जॅाय करत होता युवक; क्षणात होत्याचं नव्हत झालं, शार्कने जीवंत गिळलं! https://www.navarashtra.com/viral/shark-attack-on-man-while-he-was-enjoying-in-beach-in-egypt-video-goes-viral-nrps-413731.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, धनबादच्या भोवरा कोलिअरी भागातील या खाणीत शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. भोवरा कोलिअरी भागातील भारत कुकिंग कोल लिमिटेडच्या (BCCL) परिसरात ही दुर्घटना घडली आहे. अपघात होताच तात्काळ बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं असून खाणीत अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अपघाताच नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.