Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

30-Year-Old Chinese Man Retires: वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी घेतली रिटायरमेंट! ना नोकरी, ना बॉसचा त्रास; कसं केलं आर्थिक नियोजन?

30-Year-Old Chinese Man Retires: चीनमधील फॅन जुनजी या तरुणाने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतल्याने त्याची चर्चा होत आहे. इंटरनेट हेल्थकेअर सेल्स क्षेत्रात काम करताना त्याला दिवसाचे 18 तास काम करावे लागत होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 10, 2026 | 12:42 PM
30-Year-Old Chinese Man Retires (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

30-Year-Old Chinese Man Retires (फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चीनच्या फॅन जुनजीने वयाच्या 30 व्या वर्षी घेतली निवृत्ती.
  • 3 वर्षांत तब्बल 14 फ्लॅट खरेदी केले.
  • 12 फ्लॅटमधून महिन्याला 17,800 युआन भाडे मिळते.

नोकरी म्हटलं तर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत एक वेगळंच चक्र सुरू असते. नोकरी म्हटलं तर काही ताण तणाव सहन करत जगत असतात. तर काहींना अनेकदा बॉसचा ओरडा देखील खावा लागला आहे. तर काहींच्या नोकरीची सुरुवातच ही वयाच्या 30 व्या वर्षी सुरू होते. परंतु चीनमधील एका तरुणाची जोरदार चर्चा होत आहे. चीनमधील एक तरुणाने चक्क वयाच्या 30 व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतली आहे. या तरुणाच्या निवृत्तीची जोरदार चर्चा होत आहे. 30-Year-Old Chinese Man Retires:

महिन्याला लाखो रुपये कमवतो

आपल्याकडे लोक 30 व्या वर्षी नोकरीला लागतात, घर घ्यायचा विचार करतात. पण चीनमध्ये एक पोरगा असा आहे ज्याने 30 व्या वर्षी नोकरीलाच रामराम ठोकला. आता तो काहीच काम करत नाही, तरी महिन्याला लाखो रुपये कमवतो. कसं? तर त्याने भाड्याचा असा खेळ मांडलाय की त्याला काम करायची गरजच उरली नाही.

सेल्समध्ये नोकरी

या तरुणाचं नाव आहे फॅन जुनजी. तो चीनच्या जिलीन भागातला. नोकरीसाठी तो हुनान प्रांतातल्या चांगशा शहरात गेला होता. तिथे त्याने इंटरनेट हेल्थकेअर सेल्समध्ये नोकरी केली. नोकरी म्हणजे नोकरी, दिवसाचे 18-18 तास काम. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम, काम आणि काम. बॉसचा ओरडा, टार्गेटचं टेन्शन, झोप नाही, जेवण नाही. शेवटी तो या सगळ्याला इतका वैतागला की त्याने ठरवलं, बस झालं, आता नोकरीवर अवलंबून राहायचं नाही.

Who Is Gadi Eisenkot? नेतन्याहूंच्या सत्तेला आव्हान देणारे गादी आयझेनकॉट कोण? जाणून घ्या त्यांचा संपूर्ण प्रवास

जवळपास 3 लाख डॉलर खर्च

मग त्याने डोकं लावलं. मोठ्या शहरात महागडे फ्लॅट घेण्यापेक्षा त्याने चांगशा शहरातले जुने, स्वस्त फ्लॅट घ्यायला सुरुवात केली. त्याला माहीत होतं, जुने फ्लॅट कमी किमतीत मिळतात. थोडं रिपेअर केलं की ते भाड्याने देता येतात. हाच त्याचा प्लॅन होता.त्याने एका जुन्या फ्लॅटसाठी डागडुजी धरून 3 लाख युआन म्हणजे आपल्या पैशात साधारण 42 लाख रुपये खर्च केले. हळूहळू त्याने असे फ्लॅट घेत राहिला. 2023 ते 2026 या तीन वर्षात त्याने एक-दोन नाही, तर तब्बल 14 फ्लॅट घेतले. या 14 फ्लॅटसाठी त्याने 20 लाख युआनपेक्षा जास्त, म्हणजे जवळपास 3 लाख डॉलर खर्च केले.

महागड्या फ्लॅटचं 2200 युआन भाडं

त्यातले बरेचसे फ्लॅट चांगशामध्येच आहेत. काही छोटे फ्लॅट पण त्याने घेतले. काही फ्लॅट तर त्याला फक्त 1.5 लाख युआनला मिळाले. त्याचा एक महागडा फ्लॅट 2.45 लाख युआनचा आहे. त्याने 14 पैकी 2 फ्लॅट स्वतःसाठी ठेवले आहेत. बाकीचे 12 फ्लॅट त्याने भाड्याने दिले आहेत.आता हिशोब बघा. ज्या फ्लॅटला 1.5 लाख युआन लागले, त्याचं महिन्याला 1700 युआन भाडं येतं. आणि महागड्या फ्लॅटचं 2200 युआन भाडं येतं. असे 12 फ्लॅट मिळून त्याला महिन्याला 17800 युआन भाडं मिळतं. वर्षाला हे झालं 2.13 लाख युआन. आपल्या भारतीय पैशात बोलायचं झालं तर वर्षाला जवळपास 25 लाख रुपये. आणि त्याला काहीही करायची गरज नाही. भाडं आपोआप खात्यात येतं.

वंदे भारत स्लीपरमध्ये ‘तत्काळ कोटा’ नाही; भारतीय रेल्वेकडून घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय

विचार करा, ज्या वयात लोक नोकरीसाठी धावपळ करतात, त्या वयात हा पोरगा निवृत्त झालाय. त्याला सकाळी उठून बॉसला उत्तर द्यायची गरज नाही. टार्गेटचं टेन्शन नाही. तो आरामात आयुष्य जगतोय.पण हे इतकं सोपं होतं का? नाही. त्याने 3 वर्षं दिवसाचे 18 तास काम केलं. पैसे साठवले. मग हुशारीने गुंतवले. मोठ्या शहरात दिखाव्यासाठी महागडा फ्लॅट घेण्याऐवजी त्याने स्वस्त फ्लॅटमध्ये पैसा लावला. हाच त्याचा स्मार्टपणा होता.

चीनमध्ये सगळीकडे चर्चेत

आजकाल बऱ्याच तरुणांना हेच वाटतं, नोकरीच्या चक्रातून बाहेर पडावं. पण बाहेर पडून काय करायचं, हे फॅनने दाखवून दिलं. नोकरी सोडणं म्हणजे आळशी होणं नाही, तर पैशाला असं कामाला लावणं की पैसा आपल्यासाठी काम करेल.फॅनची ही गोष्ट आता चीनमध्ये सगळीकडे चर्चेत आहे. लोक म्हणतायत, 30 व्या वर्षी निवृत्त होणं खरंच शक्य आहे, फक्त प्लॅनिंग पाहिजे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: वयाच्या 30 व्या वर्षी निवृत्ती घेणाऱ्या तरुणाचे नाव काय आहे?

    Ans: चीनमधील या तरुणाचे नाव फॅन जुनजी आहे.

  • Que: फॅन जुनजीने कोणत्या वयात निवृत्ती घेतली?

    Ans: त्याने वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतली.

  • Que: फॅन जुनजीने किती फ्लॅट खरेदी केले?

    Ans: 2023 ते 2026 या तीन वर्षांत त्याने एकूण 14 फ्लॅट खरेदी केले.

Web Title: 30 year old chinese man retires early by buying 14 rental apartments rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 12:42 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.