उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसाचार उसळला होता. 24 नोव्हेंबरला शाही मशिदीला भेट देण्यास मुस्लिम समाजाने विरोध केला. त्यामुळे पोलिस आणि स्थानिक लोकांमध्ये बाचाबाची झाली. या हिंसाचारात सुमारे चार मुस्लिम लोक मारले गेले. याशिवाय पोलिसांसह अनेक जण जखमी झाले. हा वाद अद्याप ताजा असतानात संभलमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभलमधील मुस्लिमबहुल भागात 46 वर्षे जुने बंद मंदिर आढळून आले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभल हिंसाचारानंतर पोलीस प्रशासनाने बदमाशांच्या विरोधात शोध मोहीम राबवण्यास सुरूवात केली होती. या शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना अवैधरित्या वीजचोरीचे प्रकारही आढळून आले. परिसरातील वीज चोरीची अवस्था पाहून एस.पी. कृष्ण कुमार बिश्नोईदेखील चांगलेच संतापले होते. वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी एसपींना सांगितले की, ‘जेव्हा आम्ही तपासणीसाठी जातो तेव्हा दबंग लोक आम्हाला धमकावतात. बघून घेण्याची धमकी दिली जाते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने अवैध अतिक्रमण आणि वीजचोरीविरोधात मोठी कारवाई सुरू केली.
मनसे महायुतीत सामील होणार? ‘हा’ बडा नेता फडणवीसांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?
याच कारवाई दरम्यान, मशिदी आणि घरांवर छापे टाकताना मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आली. मात्र यावेळी शनिवारी सकाळी दीपा राय परिसरात तपासणी करत असताना त्यांना अचानक 1978 सालचे मंदिर आढळून आल्याने पोलीसांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
मुस्लिमबहुल भागात बंद मंदिर आढळून आल्याने तपास पथकाने थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर डीएम एसपी आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. 46 वर्षांपासून बंद असलेले हे मंदिर समाजवादी पक्षाचे खासदार झियाउर रहमान बुर्के यांच्या घरापासून अवध्या 200 मीटर अंतरावर सापडले. मंदिरात हनुमानजी, शिवलिंग आणि नंदीची मूर्ती स्थापित आहे.
या प्रकरणाबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीश चंद्र म्हणाले, ‘काही लोकांनी घरे बांधून मंदिराचा ताबा घेतल्याचे आणि मंदिराच्या आसपास बांधकाम करून मंदिराचे अस्तित्त्व लपवल्याचे तपासणीदरम्यान असे आढळून आले. पण तपासणीदरम्यान मंदिर उघडल्यानंतर मंदिरात हनुमानजी, शिवलिंग आणि नंदीची मूर्ती आढळून आली. त्यानंतर मंदिराची स्वच्छताही कऱण्यात आली. मंदिरावर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. एकेकाळी या भागात हिंदू कुटुंबे राहत होती आणि काही कारणांमुळे त्यांनी हा परिसर सोडला होता.
Martial Law: दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव
संभलचे डी.एम. राजेंद्र पानसिया यांनी सांगितले की, मुस्लिम लोकसंख्येच्या मध्यभागी असलेल्या बंद मंदिराजवळ एक प्राचीन विहीर असल्याची माहिती देखील मिळाली आहे. विहीर खोदली जात आहे. मंदिराच्या परिसरातील अतिक्रमणही पाडण्यात येणार आहे.
संभलमध्ये डीएम, एसपी आणि एएसपीसह भरारी पोलिस दल आणि वीज विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी शनिवारी पहाटेच्या अंधारात संपूर्ण परिसरात कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान शेकडो घरांमध्ये पाण्याच्या टाक्यांमध्ये बसविण्यात आलेले मोठे इलेक्ट्रिक हिटर आणि गरम पाण्याच्या रॉडमुळे मोठ्या प्रमाणात वीजचोरी उघडकीस आली. यासोबतच परिसरातील तीन मशिदींच्या आत जाणाऱ्या विद्युत तारांमधूनही घरांमध्ये वीजपुरवठा करण्यात येत होता. एस.पी. के.के. बिश्नोई आणि डीएम यांनी मशिदीतून वीज चोरी झाल्याची पुष्टी केली आहे.