पणजी : गोवा विधानसभेसाठी ७८.९४ टक्के मतदान झाले आहे. मात्र, पोस्टल मते विचारात घेतली तर सर्वसाधारणपणे ८० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी कुणाल यांनी दिली. सर्वाधिक मतदान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात झाले तर सर्वात कमी मतदान बाणवली मतदारसंघात ७०.०२ टक्के झाले आहे.
आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री उमेदवार अमित पालेकर यांनी त्यांच्या आईसह विधानसभा निवडणुकीत मतदान केले. “बदल घडवून आणण्याचा हा आमचा क्षण आहे” असे ते म्हणाले.