
आजकाल अनेक पालक तक्रार करताना दिसताता की त्यांच्या मुलाला मोबाईल फोनचं (Mobile) व्यसन लागलं आहे. तो निट जेवत नाही, अभ्यास करत नाही. पण ह्या तक्रारी नंतर पुढे काय होते कधी विचार केला आहे का? आपण तक्रार करतो आणि परत जैसे थे. मुलं रडलं की पुन्हा त्याच्या हातात मोबाईल देतो. पण असं करणं किती धोकादायक आहे हे राजस्थानमधील एका घटनेवरुन सिद्ध होते. राजस्थानमधे ऑनलाइन गेमचं व्यसन एका मुलाच्या जिवावर बेतलं आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे एका मुलांचं मानसिक संतुलन बिघडण्याबरोबरच दृष्टीही बिघडली.
[read_also content=”ऑस्ट्रेलियात खालिस्तानी समर्थकांची दहशत, भारतीय विद्यार्थ्यावर खलिस्तानी समर्थकांचा हल्ला; लोखंडी सळीने बेदम मारहाण https://www.navarashtra.com/world/khalistani-attack-on-indian-student-and-beat-him-with-aron-rod-in-australia-nrps-be-432059.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पिडीत मुलाचे वडील ऑटोचालक आणि आई धुणीभांडीची कामं करते. पीडित मुलाचे वय अवघे १५ वर्षे आहे. त्याच्या वडिलांनी सांगितले की, 6 ते 7 महिन्यांपूर्वी मुलगा सतत PUBG खेळत होता. घरचा फोन फ्री असायचा तेव्हा तो PUBG खेळायला लागला. या दरम्यान, त्याला त्याचव्यसन लागले. घरातील सदस्यांनी खेळ खेळण्यास नकार दिल्यावर तो बाहेर जाऊ खेळायचा. पूर्वी तो 4 ते 5 तास खेळ खेळायचा, परंतु हळूहळू सर्व वेळ फक्त खेळ खेळू लागला. 24 तासात फक्त 10 ते 12 तास खेळ खेळायचा. मी मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला की तो चिडायचा, राग यायचा आणि जेवण सुद्धा नाही करायचा.
पिडित मुलाच्या वडिलांनी सांगितले की, काही दिवसांनी त्याच्या मुलाच्या डोळ्यात त्रास जाणवू लागला. त्याला अंधूक दिसू लागलं. यानंतर डॉक्टरांना दाखवले असता त्याच्या डोळ्याची दृष्टी कमी झाल्याची बाब समोर आली.
सततच्या मोबाईलच्या वापरामुळे त्याचं मानसिक संतुलनही बिघडंल. तो सतत चिडचिड करू लागला. मोबाईल नाही दिला तर आकांताडंव करायचा. कधी कधी तर त्याला आता घरात बांधून ठेवावे लागत होते, पण संधी मिळताच घरातून पळून जायचा. तो घरातून दोनदा रेवाडी आणि एकदा बांसूरला पळून गेला होता. त्याची हळूहळू प्रकृती इतकी खराब होत आहे की त्यांची बोटे आणि शरीराचा कोणताही भाग स्वतःच हलू लागतो. तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला १५ दिवस विशेष बाल देखभाल वसतिगृहात ठेवण्यात आले. जेथे काळजी आणि औषधोपचारानंतर स्थिती थोडी सुधारली आहे.
झोपेची पद्धत विस्कळीत होते. त्यामुळे इतर कामांवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, सूज आणि दृष्टी कमी होतो. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी झाली होते. स्मरणशक्ती कमी होतो