Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video Viral : पेटती कार अचानक चालकाविना धावू लागली! पुढे काय घडलं पाहाच…

सुदर्शनपुरा पुलियाच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या कारला आग लागली. ही आग इतकी भडकली की, पुढच्या काहीच क्षणात कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. धक्कादायक म्हणजे आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही पेटती कार विनाचालक होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 14, 2024 | 01:25 PM
Video Viral : पेटती कार अचानक चालकाविना धावू लागली! पुढे काय घडलं पाहाच...

Video Viral : पेटती कार अचानक चालकाविना धावू लागली! पुढे काय घडलं पाहाच...

Follow Us
Close
Follow Us:

जयपूर : जयपूर शहरातील अजमेर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एक थरारक घटना घडली. ज्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्यांना मोठा धक्का बसला. शहरात संध्याकाळच्या वेळी रस्त्यावरुन सुदर्शनपुरा पुलियाच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या कारला आग लागली. ही आग इतकी भडकली की, पुढच्या काहीच क्षणात कार आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली. धक्कादायक म्हणजे आगीच्या ज्वाळांनी वेढलेली ही पेटती कार विनाचालक होती आणि ती रस्त्यावरुन धावत होती. कार धावत असल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या आणि उभ्या असलेल्या वाहन आणि नागरिकांनाही धोका होता. मात्र, पुढे ही कार जाऊन एका दुचाकीवर आदळली. ज्यामुळे ती थांबली आणि पुढील अनर्थ टळला.

Ghost Rider, Jaipur Edition
pic.twitter.com/BTQHTewAx3

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 13, 2024

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शनपुला पुलियाकडे जाणाऱ्या अजमेर रोडवर हा सर्व विचित्र प्रकार घडला. या कारमध्ये चालक नव्हता. ही कार मार्गात येणाऱ्या मोटरसायकलला धडक देत पुढे जात होती. अनेकजण स्वत:च्या बाईक मार्गातून बाजूला काढण्याचा प्रयत्न करत होते. ही बर्निंग कार अखेर रस्त्याच्या डिव्हायडरला धडक देऊन थांबली. सुदैवाने या विचित्र अपघातामध्ये कोणातीही जिवतहानी झाली नाही किंवा कोणी गंभीर जखमी झालं नाही.

सोशल मीडियावर या चालकाशिवायच्या जळत्या कारचा रस्त्यावर धावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. समोर आलेल्या माहितीनुसार, जितेंद्र जनगीड नावाची व्यक्ती ही कार चालवत होती. मानसरोवर येथील दिव्य दर्शन अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या जितेंद्र यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि पुढे या कारने पेट घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर उतार असल्याने ही कार आग लागल्यानंतरही कारमध्ये चालक नसल्याने धाव होती. कार चालवत असताना जितेंद्र यांना कारच्या एसी व्हेंटमधून धूर येताना दिसला. त्यांनी त्यांच्या भावाला फोन केला. त्यांच्या भावाने त्यांना बोनेट उघडून इंजिन तपासण्यास सांगितलं. जितेंद्र यांनी कार थांबवली आणि ते बोनेट उघडून तपासणी करण्याच्या तयारी असतानाच बोनेट उघडताच त्यांना इंजिनला आग लागल्याचं लक्षात आलं.

जिंतेंद्र काही करण्याच्या आधीच आग पसरली. त्यामुळे हॅण्डब्रेक फेल झाला आणि कार उड्डाणपूलाच्या उताराच्या दिशेने धावू लागली. रस्त्यात उभं राहून जळणारी ही कार पाहणाऱ्या बघ्यांच्या काही बाईक्सला बाईक्सला या कारने धडक दिली. तसेच एका कारलाही ही बर्निंग कार धक्का देऊन गेली. अखेर ही कार एका डिव्हायडरला धकली आणि थांबली.

ही कार रस्त्यावर धावत असतानाच कोणीतरी अग्नीशामदलाला फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली. कार डिव्हायडरला धडकून थांबल्यानंतर अग्निशामनदलाने काही मिनिटांमध्ये आग विजवली. आग विजवेपर्यंत ती पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Web Title: A video of a car on fire suddenly running has gone viral nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 01:23 PM

Topics:  

  • Car Video Viral
  • Jaipur

संबंधित बातम्या

राजाच्या अनोख्या कल्पनेने बदलली शहराची ओळख; तुम्हाला माहिती आहे का? जयपूरला कसा मिळाला पिंक सिटीचा दर्जा
1

राजाच्या अनोख्या कल्पनेने बदलली शहराची ओळख; तुम्हाला माहिती आहे का? जयपूरला कसा मिळाला पिंक सिटीचा दर्जा

Pune Airport: पुणे-जयपूर विमानाला ६ तासांचा उशीर; प्रवासी संतप्त, नेमके कारण काय?
2

Pune Airport: पुणे-जयपूर विमानाला ६ तासांचा उशीर; प्रवासी संतप्त, नेमके कारण काय?

धक्कादायक! पती-पत्नीचा वाद; संतप्त बापाने १८ महिन्यांच्या मुलाला बोअरवेलमध्ये फेकलं
3

धक्कादायक! पती-पत्नीचा वाद; संतप्त बापाने १८ महिन्यांच्या मुलाला बोअरवेलमध्ये फेकलं

जयपूरमध्ये एका घरात आढळले विवाहित जोडप्याचे मृतदेह, आत्महत्या की हत्या?
4

जयपूरमध्ये एका घरात आढळले विवाहित जोडप्याचे मृतदेह, आत्महत्या की हत्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.