mysore to darbhanga bagmati express news
तामिळनाडू : तामिळनाडूमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. काल (दि.11) रात्री हा अपघात झाला असून 9 च्या सुमारास झाल्याचा अंदाज आहे. म्हैसूर येथून दरभंगाच्या दिशेने जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसने ट्रॅकवर उभ्या असलेल्या ट्रेनला जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवरून खाली घसरले असून काही डब्यांना आगही लागली. यामध्ये 19 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
चेन्नई रेल्वे विभागातील पोनेरी कावरपेट्टई विभागात एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात झालेल्या धडकेत कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नसली तरी प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य वेगाने सुरू केले. तसेच रुग्णवाहिका आणि एनडीआरएफ तुकड्याही पाठवण्यात आल्या.
VIDEO | Mysuru-Darbhanga Express met with an accident near Kavarapettai Railway Station in the Chennai Division, causing derailment of at least two coaches. More details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/ukS2r9WicS
— Press Trust of India (@PTI_News) October 11, 2024
मीडिया रिपोर्टनुसार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोनेरी स्टेशन ओलांडल्यानंतर म्हैसूर दिब्रुगड दरभंगा एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आला.पण “कावरपेट्टाई स्थानकात प्रवेश करत असताना, ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना जोरदार धक्का बसला आणि दिलेल्या सिग्नलनुसार मेन लाइनमध्ये जाण्याऐवजी 75 किमी प्रतितास वेगाने धावणारी ही एक्स्प्रेस ‘लूपलाइन’ मध्ये गेली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही ट्रेन म्हैसूर येथून पेरम्बूरमार्गे बिहारमधील दरभंगाला जात होती. रात्री एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्यानंतर 13 डबे रुळावरुन घसरले, तर काही डब्यांनी पेट घेतला.
The Mysuru-Darbhanga train accident mirrors the horrific Balasore accident—a passenger train colliding with a stationary goods train.
Despite many lives lost in numerous accidents, no lessons are learned. Accountability starts at the top. How many more families must be… https://t.co/ggCGlgCXOE
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 12, 2024
या अपघातावरुन राहुल गांधींनी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले की, म्हैसूर-दरभंगा ट्रेनचा अपघात बालासोरच्या भीषण बालासोरच्या भीषण अपघाताची आठवण करून देतो. एक प्रवासी ट्रेन एका थांबलेल्या मालगाडीला धडकली. अनेक अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला असूनही काही धडा घेतलेला नाही. खरं तर ही जबाबदारी वरपासून सुरू होते. मात्र, या सरकारला जाग येण्यापूर्वी आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त करायची आहेत?”, अनेक अपघात होऊनही सरकारने कोणताही धडा घेतला नाही. किती कुटुंबं उद्ध्वस्त झाल्यावर या सरकारला जाग येणार? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.