
Faridabad News: राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) फरिदाबाद येथून जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके जप्त करून एक महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या कारवाईत ३५० किलोग्रॅम स्फोटके, दोन एके-४७ रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई काश्मिरी डॉक्टर आदिल अहमद राठर यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनंतर करण्यात आली. तपासात उघड झाले की राठर यांने यापूर्वी काश्मीर खोऱ्यात त्याच्या लॉकरमध्ये एके-४७ रायफल आणि दारूगोळा ठेवला होता. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, डॉ. आदील अमदने स्वतःसाठी एक वेगळी खोली भाड्याने घेतली होती, जिथे त्यांनी शस्त्रे आणि स्फोटके लपवून ठेवली होती. या प्रकरणाचा तपास अधिक गंभीर दिशेने वळला असून, प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डॉ. आदिल अहमद राठरला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीदरम्यान, त्याने त्यांच्या नेटवर्कच्या इतर सदस्यांबद्दल आणि त्यांच्या कारवायांबद्दल महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळए पोलिसांना पुढील तपासासाठी आधार मिळाला. ३० ऑक्टोबरला पोलिसांनी नेटवर्कचा आणखी एक सदस्य डॉ. शकील यालादेखील पोलिसांनी अटक केली दोघांच्या चौकशीदरम्यान शकीलनेदेखील फरीदाबादच्या धौज गावात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रे लपवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रविवारी ( ९ नोव्हेंबर) सकाळी त्याला फरीदाबादला नेत ज्या घरात स्फोटके लपवण्यात आली होती, त्या ठिकाणी नेत सर्व स्फोटके जप्त केली.
पोलिसांचा तपास जसजसा पुढे सरकत असतानाच आणखी एका आरोपी, डॉ. मुझम्मिलला अटक करण्यात आली. तो फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठात शिकवत होता. या संपूर्ण मॉड्यूलमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानले जाते.
छापेमारी करताना पोलिसांनी अंदाजे ३६० किलो संशयित अमोनियम नायट्रेट जप्त केले. अमोनियम नायट्रेट आयईडी बनवण्यासाठी वापरला जाणारा एक अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. हे साहित्य आरडीएक्स नसले तरी ते अत्यंत धोकादायक आहे आणि मोठा स्फोट घडवून आणण्यास सक्षम आहे.
या कारवाईत, अंदाजे ५ किलो जड धातू (आयईडीची प्राणघातकता वाढविण्यासाठी वापरता येणारे) जप्त करण्यात आले. २० टाइमर, बॅटरी, २४ रिमोट, इलेक्ट्रिक वायरिंग आणि अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे आयईडी-साहित्यही जप्त करण्यात आले. शस्त्रसाठ्यात एक असॉल्ट रायफल (AK-47 सारखी दिसणारी पण आकाराने थोडी लहान), तीन मॅगझिन, एक बंदूक (पिस्तूल), एकूण ९२ जिवंत काडतुसे (८४ + ८) आणि दोन रिकामे काडतुसे सापडले. स्फोटके आणि उपकरणांनी भरलेले एकूण बारा सुटकेस आढळले. त्याचबरोबर अनेक वॉकी-टॉकी सेट आणि इतर संप्रेषण उपकरणेही नष्ट करण्यासाठी वापरली जाणारी वस्त्रे जप्त झाली.
प्राथमिक तपासानुसार, अटक केलेले आरोपी उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याच्या उद्देशाने संघटित दहशतवादी मॉड्यूलशी संबंधीत असू शकतात. पोलिसांचा असा विश्वास आहे की जर वेळेत ही सामग्री जप्त झाली नसती तर मोठी दहशतवादी घटना घडू शकली असती. जप्त केलेली सर्व वस्तू फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून गुप्तचर संस्था नेटवर्कच्या निधीचे स्रोत, सीमापार कथित कनेक्शन, स्थानिक सुविधा पुरवणारे व डिजिटल ट्रेल्स यांची चौकशी करत आहेत.
सरकार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईला मोठे यश म्हटले आहे आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत की हा प्रकरण लवकरच राष्ट्रीय तपास संस्था (NIA) कडे हस्तांतरित किंवा NIA स सहभागाने चौकशी पुढे नेली जाऊ शकते.