नवी दिल्ली : बँकांचे कर्ज बुडवून फरार झालेला आरोपी विजय मल्ल्याला (Vijay Mallya) आणखी एक झटका बसला आहे. मल्ल्याच्या वकिलाने त्याच्या बाजून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) खटला लढण्यास नकार दिला आहे. विजय मल्ल्याचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्याशी बोलणे शक्य होत नाही. त्यामुळे त्याच्या वकिलाने खटल लढण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षापासून विजय मल्ल्याला भारतात (India) आणण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र तेव्हापासून हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.
[read_also content=”लाच प्रकरणातील तलाठ्याची निर्दोष मुक्तता; बारामती विशेष न्यायालयाचा निकाल https://www.navarashtra.com/maharashtra/acquittal-of-talathi-in-bribery-case-judgment-of-baramati-special-court-nrdm-341471.html”]
विजय मल्ल्याचा स्टेट बँक ऑफ इंडियासोबत काही आर्थिक वाद सुरू आहे. या प्रकरणात वकील ईसी अग्रवाल हे मल्ल्याच्या बाजूने खटला लढत आहेत. मात्र नुकत्याच झालेल्या सुनावणीत ईसी अग्रवाल यांनी मल्ल्याचा खटला लढवण्यास नकार दिला आहे.
अग्रवाल यांनी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाला सांगितले की, विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहे. पण ते माझ्याशी बोलत नाहीत. माझ्याकडे फक्त त्याचा ईमेल आयडी आहे. आता आम्ही त्यांचा शोध लावू शकत नसल्यामुळे मला या खटल्यातून मुक्त करा. न्यायालयाने ईसी अग्रवाल यांचे हे अपील मान्य करीत कोर्ट रजिस्ट्रीमध्ये मल्ल्याचा ईमेल आयडी आणि पत्ता देण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार आहे.