Delhi Bomb Blast News : दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात सहभागी असलेल्या दहशतवादी उमरचा पहिला फोटो आणि त्याच्या पांढऱ्या आय-२० कारचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि काही जण गंभीर जखमी झाले आहेत. कार स्फोटामुळे जवळपासच्या गाड्याही उद्ध्वस्त झाल्या आहेत,…
दिल्लीत झालेला स्फोट इतका शक्तिशाली होता की, यातील बाधिकांच्या शरीराचे अवयव अक्षरश: वेगळे झाल्याचे दिसून आले. जवळच्या वाहनांच्या खिडक्याही फुटल्या. स्फोटाचा आवाज चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आयटीओ चौकापर्यंत ऐकू आला.
दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले की, एका संथ गतीने चालणाऱ्या कारमध्ये स्फोट झाला. गाडी लाल दिव्याजवळ असताना एक शक्तिशाली स्फोट होऊन अनेक वाहनांनाही आग लागली.