female astrologer prediction tweet of plane crash is going viral after the Ahmedabad accident
Ahmedabad Plane Crash News Marathi: गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनने संपूर्ण देशात दु:खाचे वातावरण पसरलले आहे. या भीषण अपघातात क्रू मेंबर्ससह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांचे मृतदेह सापडले आहे. परंतु मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाचे AI-171हे विमान २३० प्रवाशांना घेऊन लंडनला निघाले होते. परंतु विमानाच्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांनी विमान कोसळले आणि भीषण स्फोट झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. या विमानात १२ क्रू मेंबर्स, १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन आणि ७ पोर्तुगाल नागरिकांचा समावेश होता.
सरदार वल्लभाई पटेल विमानतळाजवळ हा अपघात झाला. विमानाचे इंजिन अचानक बंद पडले. पायलटने विमान वळवण्याचा प्रयत्न केला पंरतु ६२५ फूट उंचीवरुन विमान कोसळले. याच वेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. या विमान अपघाताचे भाकितं सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. एक महिला जोतिष्यीने याची भविष्यवाणी केली होती.
ॲस्ट्रो शर्मिष्ठा या महिला जोतिष्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर २९ डिसेंबर रोजी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिनं २०२५ साठी भविष्यवाणी केली होती. यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राबाबतही तिने भाकितं केले होते. तसेच तिने एक मोठ्या विमान अपघाताची देखील भविष्यवाणी केली होती.५ जून रोजी हे ट्विट ती पुन्हा रिपोस्ट देखील केले होते. सध्या हे ट्विट सोशल मीडिवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Fact Check: विमान कोसळतानाचा ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा? अहमदाबाद दुर्घटनेनंतर होतोय व्हायरल
तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, २०२५ मध्ये वाहतूक क्षेत्रात चांगले कामकाज होईल, पण यासोबतच विमान अपघाकाच्या धक्कादायक घटना देखील घडण्याची शक्यता आहे. असे तिने म्हटले होते. सध्या तिचे हे ट्विट अहमदाबाच्या अपघातानंतर प्रचंड व्हायरल होत आहे. सध्या या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली असून या महिला जोतिष्याच्या ट्विटने सोशल मीडियावर चर्चांणा उधाण आले आहे.
Tata will make Rafale fuselage in Hyderabad. This is just aviation expansion, ISRO will surprise the world in Space and satellite engineering, space tourism in coming two years. Predicted this last year via Nakshatra transit. I am still holding high the prediction of Plane crash… https://t.co/WjX39R7E47 — Astro Sharmistha (@AstroSharmistha) June 5, 2025
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेत दहशतवादी हल्ल्याचा संशय? आर्मी अलर्ट तर ATS घटनास्थळी दाखल