Fact Check: विमान कोसळतानाचा 'तो' व्हिडिओ खरा की खोटा? अहमदाबाद दुर्घटनेनंतर होतोय व्हायरल
Ahmedabad Plane Crash Video: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. एअर इंडियाचे बोईंग ७८७-८ विमान प्रवाशांना लंडनला घेऊन जात असताना अचानक कोसळले. यामुळे भीषण स्फोट झाला. या भयावह अपघाताचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या विमानात १२ क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. तसेच गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील यामध्ये प्रवास करत होते. या विमानातील पायलटसह सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. सध्या बचाव पथक घटनास्थळी पोहचले असून आग विझवण्याचे आणि लोकांच्या बचावाचे कार्य सुरु आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याच वेळी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती विमानाच्या आतून फेसबुक लाईव्ह करत होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला आहे की, अहमदाबादमध्ये झालेल्या अपघातात हा तरुण विमानाच्या आतून व्हिडिओ बनवत होता. यावेळी भीषण स्फोट झाला. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Gautam Vlogger (@GautamComputer) June 12, 2025
परंतु हा व्हिडिओ अहमदाबादच्या अपघाताचा नाही. प्रेस इनफर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ नेपाळमध्ये १५ जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या अपघाताचा आहे. या अपघातात क्रू मेंबर्ससह ७२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नेपाळच्या पोखरा विमानतळाजवळ २०२३ मध्ये भीषण अपघात झाला होता. या वेळी विमानातील एक भारतीय प्रवासी फेसबुक लाईव्ह करत होता. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेपाळच्या अपघातातील आहे.
नेपाळच्या या अपघातात पाच भारतीय प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अपघातापूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह सुरु केले होते. यावेळी हवेत हेलखावे खाताना दिसत आहे. व्हिडिओ सुरु असताना अचानक मागच्या भागातून स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. हे विमान देखील एअर इंडियाचे होते. हे विमान पोखरा विमानतळाजवळील सेतील नदीच्या दरीत कोसळले होते. विमानाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडली होती.
सोशल मीडिया पर एक पुरानी वीडियो को अहमदाबाद विमान हादसे से जोड़कर साझा किया जा रहा है। #PIBFactCheck
▶️ वीडियो नेपाल में जनवरी 2023 में हुए विमान हादसे की है।
▶️ आधिकारिक स्त्रोतों से प्राप्त सूचनाओं पर ही भरोसा करें।
▶️ अहमदाबाद विमान हादसे से जुड़ी प्रामाणिक जानकारी के… pic.twitter.com/5YUtbGbsa7
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 12, 2025