Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Couple Missing in Sikkim: सिक्कीममध्ये आणखी एक जोडपे गायब; दोन आठवड्यांपासून शोध सुरू

डॉ. सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्याशी संपर्क साधला. तिवारी यांनी सिक्कीमच्या राज्यपालांशी संपर्क साधून सहाय्याची विनंती केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 13, 2025 | 12:16 PM
Couple Missing in Sikkim: सिक्कीममध्ये आणखी एक जोडपे गायब; दोन आठवड्यांपासून शोध सुरू
Follow Us
Close
Follow Us:

Couple Missing in Sikkim:  मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या राजा रघुवंशी यांचा त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि काही साथीदारांनी मिळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. राजाची हत्या करून सोनम तब्बल १५ दिवस बेपत्ता होती. पण पोलिसांनी सापळा रचत सोनमसह तिच्या साथीदारांनाही अटक केली. यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकऱणानंतर आता सिक्कीम येथे हनिमूनसाठी गेलेले आणखी एक जोडपे बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

नवविवाहित जोडपे कौशलेंद्र प्रताप सिंह (वय ३२) आणि अंकिता सिंह (वय अंदाजे ३०) हे त्यांच्या हनिमूनसाठी सिक्कीमला गेले होते. परंतु २९ मे रोजी गंगटोकहून परतताना त्यांचे वाहन मुनशिथांग परिसरात १००० फूट खोल दरीत कोसळून थेट तीस्ता नदीत वाहत गेले. या अपघातात हे दोघे बेपत्ता झाले असून त्यांचा दोन आठवड्यांपासून शोध सुरू आहे.अपघातग्रस्त व्हॅनमध्ये एकूण ११ पर्यटक होते. यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले, एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर उर्वरित आठ जण बेपत्ता आहेत. या आठ बेपत्त्यांमध्ये कौशलेंद्र व अंकिता यांचाही समावेश आहे.

Israel Iran Row: इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराण चवताळला, 100 हून अधिक स्फोटक ड्रोनने हल्ला, बॅलिस्टि

शोध मोहिमेत अपयश; कुटुंबातील सदस्य निराश

या घटनेनंतर कौशलेंद्रचे वडील शेर बहादूर सिंह, सुनेचा भाऊ सौरभ सिंह आणि इतर नातेवाईक गंगटोकला पोहोचून लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात होते. घटनास्थळी बचावकार्यही सुरू झाले. मात्र खराब हवामान आणि वादळी पावसामुळे शोधमोहीमेत अडथळे येत होते. शेर बहादूर सिंह म्हणाले की, “सीआरएफचे बचावकार्य मध्येच थांबवण्यात आले. दुसऱ्या दिवशी वाहनही गायब होते आणि शोधपथकेही दिसली नाहीत.”

हवामान खात्याने २२ मे रोजी रेड अलर्ट दिलेला असतानाही पर्यटकांना त्या भागात पाठवण्यात आले, यावर त्यांनी सिक्कीम प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.

धार्मिक विधी आणि गावभर हळहळ

शोधाशोध निष्फळ ठरल्याने प्रतापगडमधील रहाटीकर गावात दुःखाचे सावट पसरले आहे. कौशलेंद्र यांची आई बेबी सिंह वारंवार बेशुद्ध पडत आहेत, तर वडील शेर बहादूर “आता मला फक्त देवाचाच आधार आहे” असे म्हणत भावनिक अवस्थेत आहेत.कौशलेंद्र यांचे आजोबा, भाजप नेते डॉ. उम्मेद सिंह यांनी सांगितले की, माँ दुर्गेश्वरी धाम येथे ५१ हजार महामृत्युंजय जपाचा धार्मिक विधी सुरू करण्यात आला असून संपूर्ण गाव त्यांच्या सुस्थित परतीसाठी प्रार्थना करत आहे.  मात्र, भाजप कार्यकर्ते असूनही सरकारी पातळीवर कोणतीही मदत मिळालेली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

परवानगी नसतानाही अवजड वाहनांची पुण्यात ‘एंट्री’; तब्बल इतक्या जणांनी गमवला जीव

राजकीय हस्तक्षेप आणि शोधाचे अद्ययावत स्थिती

डॉ. सिंह यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार प्रमोद तिवारी यांच्याशी संपर्क साधला. तिवारी यांनी सिक्कीमच्या राज्यपालांशी संपर्क साधून सहाय्याची विनंती केली.कौशलेंद्र आणि अंकिता यांच्या सामानाचे हॉटेलमधून हस्तगत करण्यात आले आहे. मात्र, ते नदीत वाहून गेले असल्याचे कोणतेही ठोस पुरावे अद्याप सापडलेले नाहीत, अशी माहिती त्यांच्या काका दिनेश सिंह यांनी दिली.

सिक्कीमच्या प्रशासनानुसार, मंगन जिल्ह्यातील मुनशिथांग परिसरात ११ पर्यटकांना घेऊन जाणारे वाहन दरीत कोसळले. एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले, तर आठ जण अद्याप बेपत्ता आहेत.

Web Title: Another couple missing in sikkim search underway for two weeks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 12:16 PM

Topics:  

  • Uttar Pradesh

संबंधित बातम्या

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
1

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…
2

Uttar Pradesh: मुलीच्या वाढदिवसादिवशीच बापाची हत्या; रात्री 11 वाजता DJ लावल्याने शेजारी संतापला आणि…

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान
3

Independence Day 2025: UP चे 33 ग्रामप्रमुख बनले स्वातंत्र्यदिनाचे ‘हिरो’; लाल किल्ल्यावर होणार सन्मान

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य
4

अर्धनग्न अवस्थेत शिर नसलेला मृतदेह विहिरीत सापडला, मृतदेहाचे तुकडे केले अन्…, दुर्गंधीमुळे उघड झाले रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.