Mahakumbh Fire : महाकुंभमध्ये पुन्हा आगीची घटना; सेक्टर नंबर 18 ला लागली आग
प्रयागराज : महाकुंभमध्ये पुन्हा काही भागात भीषण आग लागली आहे. प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभ सुरू आहे. त्यात सेक्टर 22 मध्ये यापूर्वी भीषण आग लागली होती. या भीषण आगीत अनेक तंबू जळून खाक झाले होते. असे असताना प्रयागराज येथे सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 या ठिकाणी आता भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग आटोक्यात आणण्याचे काम केले जात आहे.
महाकुंभ मेळ्यातील सेक्टर 18 ला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ही आग इतकी भीषण होती की, आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. तसेच, अग्निशमन दलाच्या पथकाने आजूबाजूचा संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या ठिकाणी जास्त गर्दी नसल्याचे समोर येत असल्याची माहिती आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे.
महाकुंभमध्ये सेक्टर 18 मध्ये भीषण आग लागली आहे. या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे.
यापूर्वी देखील लागली होती आग
महाकुंभ परिसरातील शास्त्री ब्रिज सेक्टर-19 कॅम्पमध्ये भीषण आग लागली असून काही तंबू जळून खाक झाल्याचं सांगितलं जात होते. स्वयंपाक करताना सिलेंडरमध्ये स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर आग संपूर्ण परिसरात पसरली. तथापि, या दाव्याला अद्याप अधिकृतपणे पुष्टी मिळालेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अखिल भारतीय धर्म संघ गीता प्रेस गोरखपूरच्या कॅम्पमध्ये आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले होते.