कोरोना रुग्णसंख्येत (Corona Patients) पुन्हा एकदा वाढ होत असल्याने जागतिक पातळीवर पुन्हा चिंतेचे वातावरण दिसत आहे. भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि त्रिपुरा (Tripura) ही दोन राज्ये सक्रीय कोरोना रुग्णांपासून मुक्त (Corona Free States) झाली आहेत. अरुणाचल प्रदेश शनिवारी रात्री सक्रीय केसेसपासून मुक्त झाले तर त्रिपुरा आठवडाभरापूर्वीचे कोरोना केसेसपासून मुक्त झाले आहे. याचबरोबर शनिवारी आसाममध्येदेखील कोरोनाचे सक्रीय रुग्ण आढळले नाहीत. ईशान्येकडील राज्यात गेल्या दहा दिवसांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.
[read_also content=”बीरभूम हिंसाचार प्रकरणावरून पश्चिम बंगाल विधानसभेत राडा, भाजपा –तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये हाणामारी, एकमेकांचे फाडले कपडे https://www.navarashtra.com/india/dispute-in-west-bengal-assembly-between-bjp-and-tmc-mla-on-birbhum-violence-nrsr-260841.html”]
अरुणाचल प्रदेशचे आरोग्य सचिव पी पार्थिबन म्हणाले की, सीमावर्ती राज्यात प्रदीर्घ तिसरी लाट संपवणे हे एक आव्हान होते. जेथे सक्रीय रुग्णांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मैलांचा प्रवास करावा लागला. “गेल्या डिसेंबरपासून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेपासून, आमच्याकडे आता शून्य सक्रीय रुग्ण आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये एप्रिल २०२० पासून ६४,४८४ कोरोना प्रकरणे आढळून आली आहेत. केवळ १७ लाख लोकसंख्या असलेल्या राज्यात, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही संख्या चिंतेची बाब असल्याचे सांगितले.
अरुणाचल प्रदेश आरोग्य सेवा संचालनालयाच्या ताज्या अपडेटनुसार, ६४ हजार १८८ रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर २९६ कोविड मृत्यूची नोंद झालेली आहे. त्रिपुराने जानेवारीपासून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यासाठी कठोर उपायांचा अवलंब करून कोविडमुक्त होण्याचा मार्ग दाखवला होता. त्रिपुरातील आगरतळा विमानतळावर, वैध आरटीपीसीआर अहवाल तयार केल्यानंतरही, सर्व येणाऱ्या प्रवाशांसाठी चाचणी अनिवार्य करण्यात आली होती.