Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरनाथ यात्रा उद्यापासून, यात्रेकरुंचा पहिला गट रवाना, पहिल्या दिवशी 2189 भाविकांना मिळालं टोकन, 62 दिवस चालणार यात्रा

बाबा अमरनाथची यात्रा (Baba Amarnath Yatra) उद्यापासून म्हणजे 1 जुलैपासून सुरु होते आहे. पवित्र गुहेच्या दिशेनं अमरनाथ यात्रेकरुंची पहिली टीम शुक्रवारी सकाळी जम्मूतून रवाना झाली. पहाटे साडे चार वाजता पूजा आटोपल्यानंतर, उपराज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत पहिली टीम रवाना झाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 30, 2023 | 08:22 AM
अमरनाथ यात्रा उद्यापासून, यात्रेकरुंचा पहिला गट रवाना, पहिल्या दिवशी 2189 भाविकांना मिळालं टोकन, 62 दिवस चालणार यात्रा
Follow Us
Close
Follow Us:

बालटाल : बाबा अमरनाथची यात्रा (Baba Amarnath Yatra) उद्यापासून म्हणजे 1 जुलैपासून सुरु होते आहे. पवित्र गुहेच्या दिशेनं अमरनाथ यात्रेकरुंची पहिली टीम शुक्रवारी सकाळी जम्मूतून रवाना झाली. पहाटे साडे चार वाजता पूजा आटोपल्यानंतर, उपराज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा यांच्या उपस्थितीत पहिली टीम रवाना झाली. भोले शंकराच्या जयघोषानं जम्मू निनादलं. ही यात्रा 62 दिवस चालणार आहे. यावर्षी अधिक महिना असल्यानं कालावधी 62 दिवसांचा आहे. पहिल्या दिवशी 2189 यात्रेकरुंना बालटाल रस्त्यावरुन प्रवासाचं टोकन देण्यात आलंय.

बालटालवरुन प्रवास सोपा, 10 किमी मोठा रस्ता 

बालटाल परिसरातील लहान रस्ता आता चांगला विकसीत करण्यात आलेला आहे. 16 किमी असलेल्या या रस्त्यावर 11 किमी परिसरात रस्ता तयार करण्यात येतोय. अद्याप 5 किमी रस्त्याचं काम अजून सुरु झालेलं नाही. यात्रेकरुंच्या सुरक्षेसाठी मोठी व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. 29 जूनपासून वातावरण बदलण्यासही सुरुवात झालीय. पहिल्या फळीतल्या प्रवाशांचं स्वागत पाऊस करण्याची शक्यता आहे.

सिमपासून ते गरम कपड्यांपर्यंत सर्व उपलब्ध

यात्रेकरु या प्रवासात असले तरी 300 ते 350 रुपयांत ते महिनाभराचं सिम खरेदी करु शकणार आहेत. लंगरच्या आसपास गरम कपडे आणि ट्रेकिंगचं सामानही यात्रेकरु खरेदी करु शकणार आहेत. रेनकोट, छत्र्याही विकत घेता येतील. वस्तीसाठी 500 रुपयांत टेन्टही मिळतायेत.

3 मीटर बर्फ हटवून लंगर आणि टेन्ट

यात्रेच्या मार्गावर 10 जूनपासून लंगर आणि टेन्टचं काम सुरु करण्यात आलं होतं. 3 मीटर बर्फ बाजूला करुन या ठिकाणी लंगर उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी बालटाल ते गुहेपर्यंत 16 किमी अंतरात लंगर उभारण्यात आले होते. मात्र ढगफुटी झाल्यानं अपघात घडला होता. त्यामुळं यावर्षी बालटाल ते संगम इतक्यात अंतरात लंगरची परवानगी देण्यात आलेली आहे. संगम ते गुहा या 4 किमीच्या अंतरात लंगर उभारण्यात आलेले नाहीत.

तंबाखूला यात्रेत बंदी

यावेळी यात्रेत प्रत्येक ठिकाणी तंबाखू उत्पादनांना आणि जंक आणि फ्राईड फूडवर बंदी घालण्यात आलेली आहे. दोन्ही रस्त्यांवर एकूण 120 लंगर आहेत. अडीच किमी धोकादायक असलेल्या रस्त्यावर यात्रेकरुंना हेल्मेट अनिवार्य करण्यात आलंय. हेल्मेट मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

यात्रेकरुंना प्रवासासाठी यायचं असेल तर श्रीनगर येथे येऊन 98 किमी अंतरावर असलेल्या बेस कँप बालटाल येथे पोहचावं लागणार आहे. तातडीची नोंदणी जम्मूत सुरु करण्यात आलेली आहे.

Web Title: Baba amarnath yatra begins from tomorrow first group arrived nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2023 | 08:22 AM

Topics:  

  • Amarnath Yatra
  • Yatra News

संबंधित बातम्या

Amarnath Yatra suspended : अमरनाथ यात्रा करु इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी; यंदा वेळे आधीच झाली स्थगित, नेमकं कारण काय?
1

Amarnath Yatra suspended : अमरनाथ यात्रा करु इच्छिणाऱ्यांसाठी वाईट बातमी; यंदा वेळे आधीच झाली स्थगित, नेमकं कारण काय?

लवकरच सुरु होणार अमरनाथ यात्रा, बाबा बर्फानीचे दर्शन कसं मिळणार? सर्व माहिती जाणून घ्या
2

लवकरच सुरु होणार अमरनाथ यात्रा, बाबा बर्फानीचे दर्शन कसं मिळणार? सर्व माहिती जाणून घ्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम; यात्रेकरूंची नोंदणी थंडावली
3

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा अमरनाथ यात्रेवर परिणाम; यात्रेकरूंची नोंदणी थंडावली

Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान
4

Pahalgam Terror Attack: “अमरनाथ यात्रा रद्द केली…”; मंत्री पियुष गोयल यांचे महत्वाचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.