नवी दिल्ली : कर्नाटक सरकारने हिजाबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमधील शाळा, महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या २०० मीटरच्या आत लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. हे निर्बंध पुढील दोन आठवडे कायम राहणार आहेत. कर्नाटक पोलिसांनी सांगितले की, हा आदेश तात्काळ लागू होईल. यापूर्वी राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
येथे सलग दुसऱ्या दिवशी कर्नाटक उच्च न्यायालयात या वादावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही. हे प्रकरण बुधवारी मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. मंगळवारी या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले होते की, कोणाच्या भावनांच्या आधारे निर्णय घेणार नाही, तर कायद्याच्या आधारे निर्णय घेऊ.