
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
दिवाळी निमित्त MH फिल्म्स द्वारे भारतीय संगीतप्रेंमीसाठी आनंदाची घोषणा करण्यात आली आहे. जगप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, अनुप जलोटा आणि हरिहरन हे त्रिवेणी MP3 कॉन्सर्ट टूरसाठी एकत्र आले आहेत. या टूर अंतर्गत ते संपूर्ण भारताचा दौरा करणार आहेत. ज्यामध्ये देशातील 12 शहरांचा समावेश आहे. या तीनही दिग्गजांना एकाच मंचावर ऐकण्याची मेजवानी देशातील संगीतप्रेमींना या टूरमुळे उपलब्ध होणार आहे. या टूरची घोषणा तीन ही लोकप्रिय गायकांच्या उपस्थित करण्यात आली.
या टूरबद्दल बोलताना कॉमेडियन एहसान कुरेशी म्हणाले की, लहानपणी देव आनंद यांचा तीन देविया हा सिनेमा पाहिला होता. आता मी साक्षात तीन देवतांचे ( शंकर महादेवन, अनुप जलोटा, हरिहरन) दर्शन झाले आहे. आम्ही शब्द लिहितो त्या शब्दांना लय हे गायक देतात. त्यासोबतच कुरेशी यांनी या तीनही दिग्गजांवर शायरी सादर केली. आणि त्यांना या टूरसाठी शुभेच्छा दिल्या.
एमएच 3 फिल्म्स द्वारे त्रिवेणी साऊंड ट्रेक इंडिया या टूरमध्ये शकंर महादेवन, अनुप जलोटा, हरिहरन या गायकांचे दर्जेदार परफॉर्मन्स होणार आहेच त्यासोबतच विशेष म्हणजे या लोकप्रिय गायकांची जुगलबंदीही होणार आहे. त्यामुळे हा विलक्षण अनुभव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही त्रिवेणी 3 एमपी टूर केवळ संगीतमय प्रवास नसून त्यापेक्षा अधिक असणार आहे. ही मैफिल वैविध्यपूर्ण प्रेक्षकांसाठी विचारपूर्वक तयार केली गेली असून यातून प्रेक्षकांना अद्वितीय असा अनुभव मिळणार आहेच तसेच उच्च दर्जाचे सादरीकरणही पाहायला मिळणार आहे.
सांगितिक कार्यक्रमाची तिकीटे Insider आणि Zomato Live वर उपलब्ध
या संगीत दौऱ्याकरिता तिकीटे ही Insider आणि Zomato Live वर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्रिवेणी 3 एमपी न्यू इयर बोनान्झासाठी तिकीटांची विक्री 6 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्याची सुरुवात ही 27 डिसेंबर पासून होणार आहे. पहिला सांगितिक परफॉर्मन्स हा अहमदाबादमध्ये आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर 29 डिसेंबरला दिल्ली येथे दुसरी मैफिल आयोजित केली गेली आहे. 30 डिसेंबरला इंदोरमध्ये पुढील मैफिलीचे आयोजन केले गेले आहे. त्यानंतर देशातील इतर शहरांमध्ये ही मैफल रंगणार आहे. या उच्च दर्जाच्या दिग्गज गायकांच्या मैफिलीत सहभागी होण्याची प्रेक्षकांनी ऑनलाईन तिकीट नोंदणी लवकरात लवकर करायची आहे.