
Bihar Assembly Election Result
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर १४ नोव्हेंबरला बिहारची राजधानी पटनासह राज्यातील ४६ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्रांजवळील स्ट्राँग रूममध्ये कडक त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित सर्व जिल्ह्यांमधील मतमोजणी केंद्रे आणि स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे वापरले जात आहेत, अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंज्याल यांनी दिली आहे.
उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी एजंट या ठिकाणी देखरेखीखाली उपस्थित राहतील यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व ईव्हीएम वेळेवर मतमोजणी केंद्रांवर आणले जातील आणि तेथे मतमोजणी केली जाईल. यासाठी, सर्व जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आल्याचेही निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंज्याल यांनी म्हटले आहे.
Bihar Exit Poll: एक्झिट पोलनंतर नितीश कुमार ठरले ‘मास्टरस्ट्रोक
विनोद गुंज्याल म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी, मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने सर्व स्ट्राँग रूमची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, मुख्य नियंत्रण कक्षात डिस्प्ले वायर सैल झाल्यामुळे देखरेखीमध्ये अडथळा निर्माण झाला होता, तो दुरुस्त करण्यात आला आहे. सर्व सीसीटिव्ही फुटेज संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींना दाखवण्यात आले आहेत. पहिल्या ग्रिड व्यतिरीक्त कडत देखरेख सुनिश्चित करण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर बॅकअप ग्रिड तयार करण्यात आला आहे.
दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये एकूण ३५ तक्रारी मिळाल्या होत्या. यात पहिल्या टप्प्यात पाच तक्रारी मिळाल्या पण तर दुसऱ्या टप्प्यात ३० तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यात आले. तसेच, राज्यस्तरीय नियंत्रण कक्, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्ष आणि निवडणूक अधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते. या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात आले.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पूर्णपणे निष्पक्ष आणि निर्दोष मतदान प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी एकूण १,०५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण दोन टप्प्यांत आयोजित करण्यात आले असून, दुसरा टप्पा १३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.यापूर्वी १० नोव्हेंबर रोजी पहिला टप्पा संपन्न झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार पटेल यांच्या देखरेखीखाली आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात सहा पूर्वप्रशिक्षित मास्टर ट्रेनर्सच्या पथकाने मतदान कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.