
Bihar Exit Poll:
Bihar Exit Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता बिहारसह संपूर्ण देशाचे निकालांकडे लक्ष लागले आहे. त्यानंतर आता बिहारमध्ये बहुतेक एक्झिट पोल एनडीए सरकार स्थापन होणार असल्याचे भाकित करत आहे. पण त्याच वेळी न्यूज पिंच-एआय पॉलिटिक्स एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये एनडीए आणि महाआघाडीमध्ये अटीतटीची लढत झाली असल्याचे दर्शवत आहे.
न्यूज पिंच-एआय पॉलिटिक्स एक्झिट पोलनुसार, न्यूज पिंच-एआयच्या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये सत्ताधारी आघाडीला १२१ जागा आणि महाआघाडीला ११९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा आकडा ६ जागांनी वाढू किंवा कमी होऊ शकतो. शिवाय, इतर पक्षांना ३ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच बिहारमध्ये कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असे दिसून येत आहे.
न्यूज पिंच-ए आयच्या एक्झिट पोलनुसार, राजद ८९-९७ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनू शकतो. भारतीय जनता पक्ष (भाजपा) ८५-९३ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतो. जनता दल (युनायटेड) २५-३१ जागा, लोजपा २-४ आणि एचएएम ०-१ जागा जिंकण्याचा अंदाज आहे.
तर महाआघाडीत काँग्रेसला १४-२१ जागा, व्हीआयपी २-३, सीपीआय १-२, सीपीआय (एमएल) २-५ आणि सीपीआय(एम) १-२ जागा मिळण्याचा अंदाज आहे. न्यूज पिंच आणि एआय पॉलिटिक्सचे हे एक्झिट पोल किती अचूक आहेत हे येत्या १४ तारखेलाच कळेल.
जनसुराज १२.७% मतांचा वाटा
एक्झिट पोलनुसार, जागांच्या बाबतीत एनडीए पुढे असल्याचे दिसून येते. पण त्याचवेळी मतांच्या बाबतीत महाआघाडी पुढे आहे. राज्यात एनडीएला ३८.४% मते मिळण्याचा अंदाज आहे, तर महाआघाडीला ३९.२% मते मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला १२.७ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. ही आकडेवाडी पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पक्षासाठी चांगली मानली जाते. इतरांना ९.८ टक्के मते मिळण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, जर्नल मिररच्या एक्झिट पोलमध्ये महाआघाडीचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून आले आहे. इतर एक्झिट पोलनुसार, एनडीएला सरासरी १५० ते १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ असा की नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल.