BJP leader Jamal Siddiqui's controversial statement that Shri Ram and Shri Krishna are prophets
नवी दिल्ली : प्रभू श्री राम हे पैगंबरांचे वंशज असल्याचा अजब दावा भाजपच्या नेत्याने केला आहे. यामुळे हिंदू आणि मुस्लीम समाजातील बांधवांच्या भुवया उंचावल्या आहेत. सनातन धर्म इस्लामपेक्षा खूप आधी आला. तो आपल्या स भ्यतेचा पाया आहे. सर्व मुस्लिम प्रभू रामाचे वंशज आहेत, असे वक्तव्य भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
भाजप नेते जमाल सिद्दीकी यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. मात्र यावेळी त्यांनी हिंदू आणि मुस्लीम समाजाच्या आद्य देवतांची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जमाल सिद्दीकी यांनी सनातन धर्म आणि इस्लाममध्ये मजबूत धार्मिक आणि सांस्कृतिक साम्ये असल्याचा दावा केला आहे. सिद्दीकी यांनी धर्माच्या उत्पत्तीबद्दल, इस्लामिक परंपरेतील हिंदू देवतांच्या स्थानाबद्दल आणि भारताच्या विविध समुदायांच्या एकत्रित वारशाबद्दल धक्कादायक दावे केले आहेत. त्यांनी प्रभू श्री राम हे पैंगंबरांचे दूत आणि वंशज असल्याचा अजब दावा केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“सनातन धर्म इस्लामपेक्षा खूप पूर्वीपासून आला आहे. तो आपल्या सभ्यतेचा पाया आहे. जे मुस्लिम राम आणि कृष्णावर विश्वास ठेवत नाहीत त्यांना मुस्लिम म्हणता येणार नाही. इस्लाम केवळ एका नव्हे तर अनेक पैगंबरांना मान्यता देतो. कुराणमध्ये 25 पैगंबरांचा उल्लेख आहे, परंतु हदीस आणि परंपरेनुसार, जगभरात 1 लाख 24 हजार पैगंबर पाठवले गेले. आपण प्रभू राम आणि प्रभू कृष्ण त्यांच्यापैकी नव्हते असे कसे म्हणू शकतो?” त्यांनी विचारले. “ते देवाचे दूत असू शकतात.” असे सांगत या आदरणीय व्यक्तींना इस्लामिक आध्यात्मिक वंशावळीत स्थान असू शकते, असे जमाल सिद्दीकी म्हणाले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, सर्व मुस्लिम प्रभू रामाचे वंशज आहेत. भारतातील मुस्लिम समुदायाची मुळे प्राचीन हिंदू परंपरेशी जोडलेली आहेत. दोन्ही धर्मीयांची पूजा पद्धती बदलल्या असल्या तरी मूळ संस्कृती स्थिर राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आपली ओळख अजूनही सनातनी आहे,” असे वक्तव्य भाजप नेते जमाल सिद्दीकी म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये टीकेची झोड उठली आहे. अनेकांवर यावर आक्षेप घेत भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे.