नवी दिल्ली : एनआयएने आज पहाटे केरळमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी (PFI) संबंधित तब्बल ५६ ठिकाणांवर छापे टाकले. एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीएफआयचे नेते अन्य नावावर पीएफआय सुरू करण्याच्या प्रयत्नात होते, त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली आहे.
एनआयएची छापेमारी (NIA Raid) पहाटे साडेचारपासून सुरू आहे. केरळच्या एर्नाकुलममध्ये पीएफआशी संबंधित आठ ठिकाणांवर कारवाई करण्यात आली आहे. तिरुअनंतपुरम येथे सहा जागांवर छापेमारी केली असून इतर अनेक ठिकाणांवर एनआयएची छापेमारी सुरू आहे.
National Investigation Agency (NIA) raids underway at 56 locations in Kerala in the Popular Front of India (PFI) case. Visuals from Ernakulam. https://t.co/6IQEZkI2Kf pic.twitter.com/re5qi37qoL
— ANI (@ANI) December 29, 2022
पीएफआय ही कट्टरतावादी विचारांची संघटना समजली होती. केरळ, कर्नाटकमध्ये या संघटनेचे मोठे कार्यक्षेत्र आहे. देशातील २४ राज्यांमध्ये या संघटनेच्या शाखा असून मुस्लिमबहुल भागात जनाधार मिळवण्याचा प्रयत्न या संघटनेकडून सुरू होता. महाराष्ट्रातही मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यांमध्ये त्यांचे काम सुरू होते. तर, पुणे हे पीएफआयचे मुख्य केंद्र आहे.
दहशतवादी (Terrorist) कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने (Central Government) सप्टेंबर महिन्यात पाच वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे. तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा, ईडी (ED) यांच्यासह विविध राज्यातील तपास यंत्रणांनी पीएफआयच्या कार्यालयांवर २२ आणि २७ सप्टेंबर रोजी छापे मारले आहेत. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.