Boeing 787 Dreamliner Know the safety features and other information
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक भीषण दुर्घटना घडली. एअर इंडियाचे AI-171 विमान कोसळले आहे. या विमानाने १.३१ वाजता उड्डाण केले होते. परंतु अवघ्या काही मिनिटांच या विमानाचा अपघात झाला. अपघातच्या ठिकाणावरुन आकाशात काळ्या धूराचे लोट दिसत होते. हे विमान थेट अहमदाबादमधील रुग्णालयावर कोसळले आहे. यामध्ये १५ डॉक्टर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या बचाव पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. विमानातील लोकांच्या बचावाचे कार्य सुरु असून या विमानात क्रू मेंबर्ससह २४२ लोक असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला निघाले होते.
परंतु अहमाबाद विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर मेघनानगरजवळ विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघाताचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज आपण या विमानाची वैशिष्ट्ये आणि त्याच्या सुरक्षा फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत.
या बोईंग ७८७ ड्रीमलाईनरची किंमत भारतीय रुपयांमध्ये १४०० कोटी ते २४०० कोटींपर्यंत आहे. त्याच्या मॉडेल आणि इतर वैशिष्ट्यांवरुन या विमानाच्या किमतीत बदल होतो.
अहमबाद ते लंडनचा या विमानाचा प्रवास सुमारे ७०० किलोमीटरचा आहे. हे ७८७ ड्रीमलाईनरसाठी अगदी योग्य मानले जाते. या विमानातून आरामदायी प्रवास होतो. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या याच रुटवर या बोईंग विमानाचा वापर करतात.
सुरक्षेच्या दृष्टीने या विमानात अनेक सोयी-सुविधा आहे. या प्रगत विमानात कॉकपिट सिक्युरिटी, सायबर सुरक्षा, आणि इंटेलिंजस शेअरिंग यांसारखे उपाय आहेत. तसेच तसेच रिडंडंट सिस्टिम्स, जीपीए-स आधारित नेव्हिगेशन सिस्टिम देखील या बोईंग विमानात आहे.
आपत्कालीन प्रक्रिया – क्रू मेंबर्सना या विमानाचे नियमित इमर्जन्सी ट्रेनिंग दिले जाते. यामध्ये आपत्कालीन लॅंडिग, अग्निशमन आणि वैद्यीकय सुविधा देखील आहेत. सध्या या दुर्घटनेनंतर विमानांची तांत्रिक तपशीलांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.