अह्मदाबादमध्ये कसा झाला विमानाला अपघात? (फोटो -सोशल मीडिया)
अहमदाबाद: एअर इंडियाचे अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान मेघानीनगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे विमान उड्डाण करतात अवघ्या काही मिनिटात कोसळले आहे. दरम्यान या विमानातून २४३ प्रवासी प्रवास करत होते. तसेच १० कृ मेंबर्स देखील प्रवास करत होते. हे विमान रहिवाशी भागात कोसळले आहे. त्यामुळे या घटनेत मोठी जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. तसेच हा अपघात कशामुळे घडला याची काही संभाव्य कारणे समोर आली आहेत.
एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान कोसळले आहे. दरम्यान हा अपघात कशामुळे झाला याबाबत काही संभाव्य कारणे समोर आली आहेत. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळले असू शकते असे एक कारण समोर येत आहे. तर उड्डाण केल्यावर हे विमान एका इमारतीला धडकले आणि त्यामुळे ते क्रॅश झाले असे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
#BREAKING अहमदाबाद के मेघानी नगर इलाके में एक दुखद विमान दुर्घटना हुई है। रिपोर्ट्स के अनुसार जान माल का बड़ा नुकसान इस दुर्घटना में हो सकता है।
आपातकालीन सेवाएँ घटनास्थल पर हैं। अधिक जानकारी का इंतज़ार है।#ahmedabad #planecrash pic.twitter.com/nJw2syBoZR— Mukesh Mathur (@mukesh1275) June 12, 2025
विमानाने उड्डाण केल्यावर पायलटने आपत्कालीन मेसेज पाठवला होता असे समजते आहे. मात्र त्यानंतर विमानाशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही अशी माहिती समोर येत आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. अग्निशमन दल, बीएसएफचे पथक आणि एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून याची माहिती घेतली आहे.
या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. रहिवाशी इमारती देखील या घटनेत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे बोईंग विमान अहमदाबादच्या मेघानीनगर या परिसरात कोसळले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाडया आग घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण काय?
अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळले आहे. मात्र हे विमान कशामुळे कोसळले आहे, याचे स्पष्ट कारण अजूनही समोर आलेले नाही.
Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता
विमानात किती प्रवासी होते?
अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करतासल्याची माहिती समोर येत आहे.
कोणत्या एअरलाइनचा समावेश होता?
अह्मदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळले आहे. हे विमान एअर इंडिया कंपनीचे असल्याचे समोर येत आहे.
दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी उड्डाण केलेले एअर इंडियाचे हे विमान कोसळले आहे. बीएसएफचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. एनडीएआरइच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.