मुंबई – महाविकास आघाडीच्या (MVA) खासदारांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra- Karnataka Border) तोडगा काढू असे आश्वासन त्यांनी दिल्याचेही खासदारांनी (Members Of Parliament) सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीच्या खासदारांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांची अमित शाह यांच्याकडे तक्रार केली. यावर अमित शाह येत्या १४ डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहितीही दिली आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा खपली काढण्याचा प्रयत्न केला आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर बोम्मई यांनी ट्विट केले आहे. यामुळे पुन्हा हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಿಯೋಗ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿರುವುದು ಯಾವುದೇ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಈ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಈ ರೀತಿಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆ. ಈ ಪ್ರಕರಣ ಸುಪ್ರೀಂ ಕೊರ್ಟ್ ನಲ್ಲಿದೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಸಮ್ಮತ ಪ್ರಕರಣ ಗಟ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ರಾಜಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ.
— Basavaraj S Bommai (@BSBommai) December 9, 2022
काल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर बोम्मई यांनी ट्विट केले आहे. यावरून केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर केंद्र सरकारच्या भूमिकेचाही एकप्रकारे अपमान त्यांनी केला आहे. त्यामुळे नेमके कोणाच्या पाठिंब्यामुळे आणि कोणत्या आत्मविश्वासावर ते विधाने करतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.