Campaigning for Haryana Assembly elections has stopped
चंढीगड : केंद्रीय निवडणूक आयोगाने मागील महिन्यामध्ये हरयाणा आणि जम्मू व काश्मीर विधानसभा निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून राष्ट्रीय पक्षांच्या हालचालींना वेग आला. आता हरयाणा विधानसभा मतदारसंघाच्या तोफा थंडावल्या आहेत. गुरुवार (दि.03) पर्यंत भाजप, कॉंग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांनी जोरदार प्रचार केला असून आता मतदान पार पडणार आहे. उद्या (दि.05) हरयाणा विधानसभा मतदारसंघाचे मतदान पार पडणार असून एकाच टप्प्यामध्ये हे मतदान होणार आहे. 90 विधानसभा जागांसाठी हे मतदान होणार असून भाजप हॅट्रीक मारणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
हरयाणा विधानसभा निवडणूकांच्या प्रचाराची चर्चा देशभर रंगली. यामध्ये कॉंग्रेस आणि भाजपने जोरदार प्रचार केला आहे. भाजपचे अनेक पक्षश्रेष्ठी हरयाणामध्ये दाखल झाले होते. मतदारांना आवाहन करत विविध आश्वासनं देण्यात आली आहे. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याचा भाजपचा पूर्ण प्रयत्न आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्व प्रचारप्रमुख नेत्यांनी हरयाणाच्या प्रचारामध्ये सभांचा धडाका लावला. लोकांसोबत संवाद साधत मतं वळवण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : रात्रभर पोलीस ठाण्याच्या बाहेर आंदोलनं करणं पडलं महागात; ‘महाभारत’ फेम भाजप नेत्या रूपा गांगुलींना अटक
हरयाणासाठी कॉंग्रेसने देखील मोठी प्रचार योजना आखली. निवडणूकीच्या रणनीतीमध्ये अनेक बदल करत भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला आहे. हरियाणात प्रमुख जाट समूहाने कॉंग्रेसच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला काँग्रेसला मोठा फायदा होणार आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठी व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘संकल्प यात्रे’तून हरयाणामध्ये प्रचाराची तोफ डागली. हरयाणातील विविध भागांमध्ये सलग तीन दिवस यात्रा करुन राहुल गांधी यांनी मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. आपल्या भाषणामध्ये कॉंग्रेसने लोकसभा निवडणूकीप्रमाणे हरयाणा विधानसभा निवडणूकीमध्ये देखील संविधान बचाओ असा नारा दिला. त्याचबरोबर शेतकरी आंदोलन, महिला कुस्तीगीर आंदोलन, अग्निवीर योजना आणि बेरोजगारी असे अनेक मुद्दे उचलून धरले. त्याचबरोबर कॉंग्रेस व आप लोकसभा निवडणूकीमध्ये जरी एकत्रित लढले असले तरी हरयाणामध्ये मात्र एकमेकांविरोधात उभे राहिले आहे. याचा फायदा भाजप करुन घेण्याची शक्यता आहे.
BJP की फैलाई बेरोजगारी ने हरियाणा में युवाओं के भविष्य और प्रदेश की सुरक्षा को खतरे में डाल दिया है।
जननायक @RahulGandhi जी ने हरियाणा की बहनों को वचन दिया है-
इस तबाही को रोका जाएगा, बच्चों की रक्षा की जाएगी, रोजगार मिलेंगे और खुशहाली वापस आएगी।
pic.twitter.com/As8gsWRWoV— Congress (@INCIndia) October 4, 2024