नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. https://cbseresults.nic.in/ या लिंकवर क्लिक करून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येऊ शकणार आहे.
दहावीची परीक्षा 5 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत झाली होती. या परीक्षेसाठी 21,86,940 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 93.12 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. digilocker.gov.in या वेबसाईटवर तुमचा निकाल तुम्ही पाहू शकता.
तसेच या विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल पाहता येणार आहे.
– फोनच्या मेसेज बॉक्सवर जा.
– मजकूर संदेशावर जा आणि CBSE 12 वी टाइप करा आणि जागा न देता रोल नंबर प्रविष्ट करा.
– त्यानंतर 77388299899 वर पाठवा.
– परिणाम उत्तराच्या स्वरूपात येईल.