Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता ई वाहनांचा देखील येणार आवाज : केंद्र सरकारकडून मिळाली संमती

ई वाहने पर्यावरणपूरक असल्यामुळे ही वाहनं चालवताना अजिबात आवाज येत नाही. मात्र यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या ई वाहनांचा आवाज वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून देखील याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 19, 2024 | 03:25 PM
आता ई वाहनांचा देखील येणार आवाज : केंद्र सरकारकडून मिळाली संमती
Follow Us
Close
Follow Us:

ई वाहनांचा (E -vehicle) वापर लोकांमध्ये वाढला असला तरी या वाहनांच्या बाबतीत अनेक तक्रारी समोर येत असतात. त्यापैकीच एक तक्रार म्हणजे या ई वाहनांना अजिबात आवाज नसणे. ई वाहने पर्यावरणपूरक (Eco-friendly vehicle) असल्यामुळे ही वाहनं चालवताना अजिबात आवाज येत नाही. मात्र यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. इतर वाहन चालकांना व पादचारी लोकांना ई वाहने आल्याचे लक्षात येत नाही. मात्र यावर आता उपाय म्हणून या ई वाहनांचा आवाज वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून (Central Govt) देखील याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

ई वाहनांचा आवाज वाढवला जाणार असल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रीसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) संचालक डॉ. रेजी मथाई यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना मथाई म्हणाल्या, इलेक्ट्रिक वाहनांचा आवाज इतर वाहनांसारखा होत नाही. त्यामुळे मागील काही दिवसांत पादचारी सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ई-वाहनांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ॲकॉस्टिक व्हॉईस अलर्ट सिस्टीम (एव्हीएएस) बसवण्याची शिफारस करण्यात आली होती. केंद्र सरकारने याबाबत नियमावली तयार केली असून, त्याची अंमलबजावणी आता सुरू करण्यात आली आहे असे डॉ. रेजी मथाई यांनी सांगितले.

ई वाहनांमध्ये एव्हीएएस सिस्टीम बसवल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. या सिस्टीममुळे ई-वाहन 20 किलोमीटरपेक्षा कमी वेगाने धावत असताना देखील आवाज होतो.  हा आवाज कमी तीव्रतेचा आणि पाच फुटांच्या अंतरातील पादचाऱ्यांना ऐकू येणारा असतो. इंजिनाचा आवाज होतो तसाच हा आवाज असतो.  ई-वाहन सुरू केल्यानंतर तातडीने ही यंत्रणा सुरू होते आणि वाहन बंद केल्यानंतर ही यंत्रणाही बंद होते. मागच्या वर्षी मारूती सुझुकीने काही ई-मोटारींमध्ये ट्रायल बेसिसवर वापर सुरू केला.

Web Title: Central government gives permission to install avas system in e vehicles for noise of e vehicles nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2024 | 03:25 PM

Topics:  

  • E-Vehicle

संबंधित बातम्या

होंडाच्या पहिल्या EV कॉन्सेप्ट स्टोअरचे बेंगळुरूमध्ये उद्घाटन; ACTIVA e: साठी BaaS Lite योजना सुरू
1

होंडाच्या पहिल्या EV कॉन्सेप्ट स्टोअरचे बेंगळुरूमध्ये उद्घाटन; ACTIVA e: साठी BaaS Lite योजना सुरू

“शासकीय योजना लोभी नव्हे तर…”; दानवेंनी मर्सिडीजवरून डिवचलं अन् फडणवीसांनी सगळचं काढलं, पहा Video
2

“शासकीय योजना लोभी नव्हे तर…”; दानवेंनी मर्सिडीजवरून डिवचलं अन् फडणवीसांनी सगळचं काढलं, पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.