Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारकडून ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन, ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी १० राज्यांमध्ये उघडण्यात आल्या १८ शाळा

भविष्यातील ड्रोन पायलटची (Drone Pilot) गरज लक्षात घेता १० राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी (Drone Pilot Training Schools) १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी केवळ खासगी फ्लाइंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: Apr 04, 2022 | 04:42 PM
drone

drone

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकार (Central Government) ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी नवनवीन योजना आणत आहे. अनेक क्षेत्रात ड्रोनच्या वापरालाही मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने २०२२ चा अर्थसंकल्प सादर करताना ड्रोनशी संबंधित एक मोठी घोषणा केली. मोबाईल आणि कॉम्प्युटर सारखाच दैनंदिन जीवनात ड्रोनचाही समावेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रोन पायलटचीही (Drone Pilot) गरज भासणार आहे.

भविष्यातील ड्रोन पायलटची (Drone Pilot) गरज लक्षात घेता १० राज्यांमध्ये ड्रोन पायलटच्या प्रशिक्षणासाठी (Drone Pilot Training Schools) १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत. बहुतांश ठिकाणी केवळ खासगी फ्लाइंग क्लबना शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४ प्रशिक्षण शाळांपैकी दोन शाळा पुण्यात, एक मुंबईत आणि एक बारामतीमध्ये उघडण्यात आली आहे. डीजीसीएच्या वेबसाइटवर डिजिटल स्काय नावाच्या प्लॅटफॉर्मवर ड्रोनशी संबंधित अधिक माहिती पाहता येईल.

दहा राज्यांमध्ये समाविष्ट असलेल्या अलीगढ, यूपीमधील धानीपूर हवाई पट्टीवर दोन ड्रोन पायलट प्रशिक्षण शाळा उघडण्यात आल्या आहेत. हरियाणात गुरुग्राममध्ये तीन आणि बहादूरगडमध्ये एक शाळा उघडण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर, गुजरातमधील अहमदाबाद, हिमाचल प्रदेशातील शाहपूर, झारखंडमधील जमशेदपूर, कर्नाटकातील बंगलोर, यूपीमध्ये दोन आणि हरियाणामध्ये चार शाळा सुरू झाल्या आहेत. तेलंगणातील सिकंदराबाद आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी एक शाळा उघडण्यात आली आहे. तामिळनाडूतील चेन्नई येथे एक प्रशिक्षण शाळा उघडण्यात आली आहे. देशभरात फक्त १८ शाळा उघडण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय, कृषी, पंचायती राज, संरक्षण मंत्रालय, गृह मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार, खाणकाम, वाहतूक, वीज, पेट्रोलियम आणि वायू, पर्यावरण आणि माहिती प्रसारण या क्षेत्रात ड्रोनचा वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मेघालयात कोरोना लसीच्या पुरवठ्यासाठी ड्रोन वापरण्याची परवानगी देण्यात आली होती.

ड्रोनच्या वजनानुसार त्यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ठेवण्यात आले आहेत. २५० ग्रॅम किंवा त्याहून कमी वजनाच्या ड्रोनला नॅनो ड्रोन म्हटले जाईल. यापेक्षा जास्त वजनाच्या मायक्रो किंवा मिनी ड्रोनसाठी यूआयडी व्यतिरिक्त इतर नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.

नवीन नियमांनुसार, २५० ग्रॅम ते २ किलो वजनाचे मायक्रो ड्रोन, २ किलो ते २५ किलो, २५ किलो ते १५० किलो वजनाचे मिनी ड्रोन, तसेच त्याहून अधिक वजनाच्या ड्रोनमध्ये युआयडी प्लेट व्यतिरिक्त आरएफआयडी/सिम, जीपीएस, आरटीएच (रिटर्न टू रिटर्न) आणि अँटी कॉलिजन लाइट लावणे आवश्यक आहे. मात्र, २ किलोपेक्षा जास्त वजनाच्या मानवरहित मॉडेलच्या विमानावर फक्त आयडी प्लेट लावावी लागणार आहे.

Web Title: Central government started 18 drone pilot training schools in 10 states nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2022 | 04:33 PM

Topics:  

  • india
  • केंद्र सरकार

संबंधित बातम्या

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या
1

येत्या सहा महिन्यांत भारतीयांच्या घरखर्चात ६०% वाढ होण्याची अपेक्षा, काय सांगतो अहवाल? जाणून घ्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
2

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
3

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
4

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.