Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीला मंजूरी, 10 लाख लोकांना मिळणार रोजगार

आज दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नेशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट प्रोग्राम च्या अंतर्गत 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे तब्बल 10 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. या 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्रतील शहरांचाही समावेश आहे.

  • By नारायण परब
Updated On: Aug 28, 2024 | 03:58 PM
ashwini vaishnav

ashwini vaishnav

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि. 28 ऑगस्ट 2024) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, नेशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट प्रोग्राम च्या अंतर्गत 12 इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीसाठी मंजूरी देण्यात आली आहे. यासाठी सरकार 28 हजार 602 कोटी रुपये खर्च करणार आहे. या इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीमुळे तब्बल 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, या उपक्रमा अंतर्गत गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारकडून अनेक प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. जवजवळ दोन लाख करोड चे प्रकल्प पारित करण्यात आले आहेत. इंडस्ट्रियल स्मार्ट सिटीमध्ये एकूण १.५२ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

#WATCH | After the cabinet meeting, Union Minister Ashwini Vaishnaw says, “…Cabinet today approved 12 Industrial Smart Cities under National Industrial Corridor Development Programme. The government will invest Rs 28,602 crore for this project…” pic.twitter.com/KxNYqNZ5dT

— ANI (@ANI) August 28, 2024

हे देखील वाचा- जन धन योजनेला 10 वर्ष पुर्ण, नेमकी किती खाती? किती पैसे? अर्थमंत्री सीतारामन यांनी दिली माहिती

महाराष्ट्रात ‘या’ शहराची उभारणी

उद्योग आणि अंतर्गत व्यापार (डीपीआयआयटी) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंह यांनी जुलैमध्ये दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला अशी दोन औद्योगिक शहरे आंध्र प्रदेशात आणि एक बिहारमध्ये विकसित केली जात आहेत. गुजरातमधील धोलेरा, महाराष्ट्रातील ऑरिक (औरंगाबाद), मध्य प्रदेशातील विक्रम उद्योगपुरी आणि आंध्र प्रदेशातील कृष्णपट्टणम या शहरांच्या वसाहतींसाठी आधारभूत पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या आहेत. तेथे आता उद्योगांसाठी भूखंड वाटपाचे काम सुरू आहे.

देशात 20 औद्योगिक शहरे 

या शहरांप्रमाणेच इतर चार औद्योगिक शहरांमध्ये देखील केंद्र सरकारचे एक विशेष युनिट वाहन रस्ते जोडणी, पाणी आणि वीज पुरवठा यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. ही आठ शहरे आधीच विकासाच्या टप्प्यात आहेत आणि अर्थसंकल्पात 12 नवीन औद्योगिक शहरांची घोषणा करण्यात आली आहे. ज्यामुळे देशातील या शहरांची एकूण संख्या 20 झाली आहे. असेही सिंह यांन म्हटले होते.

औद्योगिक विकासाला चालना आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात वाढ होणार आहे. महत्वाचे म्हणजे यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. राज्ये आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने या नाविन्यपूर्ण सुधारणामुळे औद्योगिक विकास आणि शहरी नियोजनाला मोठी चालना मिळू शकणार आहे.

 

Web Title: Central governments big decision12 industrial smart cities approved 10 lakh people will get employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 03:46 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.