Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅनकार्ड संदर्भात केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, काय आहे PAN 2.0? किती मोजावे लागतील पैसे?

केंद्र सरकारने पॅन कार्ड अपग्रेड करण्यासाठी पॅन 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर आता हे कार्ड QR कोडसह दिसणार आहे. अशावेळी प्रश्न उद्भवतो की जुन्या कार्ड धारकांना नवीन QR कोड असणारा कार्ड कसे मिळेल.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 28, 2024 | 08:11 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

पॅन कार्ड हे भारतीयांसाठी किती महत्वाचे आहे हे आपण सर्वेच जाणतो. एखादा तरुण 18 वर्षाचा झाला की त्याचे पालक त्यास पॅन कार्ड काढण्यास सांगतात. वेळोवेळी पॅन कार्डमध्ये अनेक बदल कार्नाय्त येतात. आता केंद्र सरकाने PAN 2.0 प्रोजेक्टला हिरवा कंदील दाखवला आहे. या नवीन बदलानुसार आता पॅन कार्डमध्ये क्यूआर कोडची सुविधा मिळणार आहे. यामुळेच नक्कीच भारत डिजिटल इंडियाकडे आपले पाऊल टाकत आहे.

अशावेळी लोकांच्या मनात अनेक प्रश्न उद्भवत आहे की जसे की पॅन कार्ड काय आहे, ते कसे बनवले जाते, आता जुन्या कार्डचे काय होणार, नवीन पण कार्ड का बनत आहे, याच्यासाठी वेगळे चार्जेस द्यावे लागणार का. चला या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

पॅन कार्ड म्हणजे काय?

परमनंट अकाउंट नंबर (PAN) इनकम टॅक्स विभागाकडून जारी केले जाते. हे मुख्यतः आर्थिक कामासाठी वापरले जाते. जसे की इनकम टॅक्स भरणे, बँक खाते उघडणे किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे. पॅन कार्ड हा 10 अंकी क्रमांक असतो, ज्यामध्ये तुमच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व माहिती नोंदवली जाते. यात तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित संपूर्ण माहितीही असते.

Ajmer Dargah: शिवमंदिराच्या जागेवर अजमेर दर्गा? कोर्टाने हिंदू सेनेची याचिका स्वीकारली; पक्षकारांना नोटिस

नवीन पॅन कार्ड कसे मिळेल?

जर तुमच्याकडे आधीच पॅन कार्ड असेल तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला नवीन पॅन कार्ड मिळेल. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही आहे. ते तुमच्या पत्त्यावर डिलिव्हर केले जाईल. परंतु, जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर तुम्हाला डिजिटल किंवा फिजिकल पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.

नवीन पॅन कार्डचे वैशिष्ट्य?

नवीन पॅन कार्डमध्ये क्यूआर कोड असणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्याचा अनुभव सुधारेल. डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन 2.0 प्रकल्प अधिक उपयुक्त बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यातही हे कार्ड महत्त्वाची भूमिका बजावू शकते. यामुळेच सरकार पॅन आणि आधार लिंक करण्यावर खूप भर देत आहे.

पॅन कार्ड बनवण्याची प्रोसेस काय?

  • तुमच्या जवळच्या पॅन सेवा एजन्सीला भेट द्या.
  • नवीन कार्ड बनवण्यासाठी तिथे अर्ज करा.
  • OTP पडताळणीसाठी मोबाईल नंबर द्या.
  • नाव, आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती द्या.
  • eKYC किंवा स्कॅन-आधारित यामधील पर्याय निवडा.
  • प्रत्यक्ष पॅनकार्डसाठी 107 रुपये द्यावे लागतील.
  • ePAN कार्डसाठी 72 रुपये शुल्क आकारले जाईल.
  • पॅन कार्ड पेमेंट केल्यानंतर eKYC प्रमाणीकरण होईल.
  • eKYC प्रमाणीकरणानंतर कागदपत्रे अपलोड करा.
  • मोबाईलवर मिळालेला OTP टाका आणि सबमिट करा.

यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट क्रमांक मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या पॅन कार्डचे स्टेटस ऑनलाईन चेक करू शकता.

Web Title: Central governments important decision regarding pan card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 08:11 PM

Topics:  

  • pan card

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.