Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठं यश! 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, 600 जवान तैनात

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीमध्ये 30 नक्षलवादी ठार झाले आहेत. काल ही कारवाई करण्यात आली असून आता 600 जवान तैनात करण्यात आले आहेत. या चकमकीमध्ये जवान सुरक्षित असल्याचे सांगितले गेले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 05, 2024 | 09:04 AM
30 Naxalites killed in Chhattisgarh Naxal area

30 Naxalites killed in Chhattisgarh Naxal area

Follow Us
Close
Follow Us:

छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणा मोठ यश मिळालं आहे. नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा अभियान सुरु आहे. यामध्ये नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. सीमेवर चकमकीमध्ये सुरक्षा यंत्रणांनी शौर्य दाखवत 30 नक्षलवादींचा खात्मा केला आहे. घटनास्थळावर 600 जवान तैनात करण्यात आले असून या ठिकाणी जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत .

छत्तीसगडमधील नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात अबूझमाड येथे नक्षलवाद्यांसोबतची चकमक येथे झाली. हा परिसर सीमाभागात येत असून या क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली. यामध्ये नक्षलवादी ठार झाले आहेत. नक्षलवाद्यांकडे AK 47 देखील असल्याचे समोर आले आहे.

Chhattisgarh: 30 naxals killed so far in the encounter with Police in ​​Maad area on Narayanpur-Dantewada border. A huge amount of automatic weapons recovered. Search operation is underway. Further details awaited. pic.twitter.com/3tweIUd6YX

— ANI (@ANI) October 4, 2024

हे देखील वाचा : महाराष्ट्रात प्रचाराचा धुराळा! आज पंतप्रधान मोदी मुंबईत तर राहुल गांधी कोल्हापूरात

या चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दंतेवाडा बॉर्डरवर नक्षलवाद्यांची कुमूक आल्याबाबत सुरक्षा यंत्रणांना खबऱ्यांकडून टिप ऑफ मिळाला होता. अंधार झाल्यानंतर गोळीबार थांबवण्यात आला होता. पण दोन्ही बाजूंनी सुरक्षा यंत्रणां पोझिशन घेऊनच थांबल्या आहेत. याठिकाणी जवळपास 600 पेक्षा जास्त जवान तैनात असून आहेत. याठिकाणी 3 नक्षली कंपन्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे, सुरक्षा जवान व नक्षल्यांमध्ये पहाटेपर्यंत चकमक सुरुच राहिल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Chhattisgarh security agencies killed 30 naxalites 600 police have been deployed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 09:04 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.